भारतीय सैन्याने अशा उद्ध्वस्त केल्या होत्या पाकिस्तानी चौक्या; लष्कराने शेअर केला नवा VIDEO
पाकिस्तानकडून सीमेवर हल्ले सुरू होते आणि भारतीय चौक्यांसह निवासी भागांनाही लक्ष्य केलं जात होतं. त्यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या चौक्या उदध्वस्त केल्या होत्या. त्याचा व्हिडिओ भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे.
ISRO 101 Mission : इस्रोच्या १०१ व्या मोहिमेला अपयश; EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग फेल, नेमकं कारण काय?
Planned, trained & executed.
Justice served.@adgpi@prodefencechan1 pic.twitter.com/Hx42p0nnon
— Western Command – Indian Army (@westerncomd_IA) May 18, 2025
या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कराचे जवान, “पहलगाम हल्ल्यानंतर हे मिशन सुरू झालं. हा केवळ राग नव्हता, हा न्याय होता. “पाकिस्तानकडून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही ठरवलं की, यावेळी असं उत्तर दिलं जाईल की त्यांच्या पिढ्यांना ते लक्षात राहील.” असं म्हणताना दिसत आहेत. ९ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास पाकिस्ताननं सीजफायरचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर आणि नागरी भागांवर हल्ला केला होता.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी गुजरातमधील भूज रुद्र माता हवाई दलाच्या तळाला भेट देताना पाकिस्तानला कडक संदेश दिला की, भारताचे ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. योग्य वेळ आल्यावर आम्ही संपूर्ण चित्रपट जगाला दाखवू. इस्लामाबादला कडक इशारा देताना सिंह म्हणाले की, भारत पाकिस्तानच्या वृत्तीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांचे वर्तन सुधारेल की नाही हे पाहण्यासाठी आम्ही पाकिस्तानला प्रोबेशनवर ठेवले आहे. शांततेच्या नावाखाली शेजारील देशाकडून भारतासोबत काय केलं जात आहे हे जगाने पाहिलं आहे. परंतु शांतता नष्ट करू इच्छिणाऱ्यांना भारत कसा प्रतिसाद देतो हे देखील जग पाहणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी जम्मू क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक ठिकाणी भेट दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैनिकांच्या अचूक आणि कठोर कारवाईचं कौतुक केलं.