Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना मिळतोय विरोधी पक्षांकडून चांगला प्रतिसाद; आता ‘या’ पक्षाने दिला पाठिंबा

इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 07, 2025 | 08:28 AM
Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना मिळतोय विरोधी पक्षांकडून चांगला प्रतिसाद; आता 'या' पक्षाने दिला पाठिंबा

Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना मिळतोय विरोधी पक्षांकडून चांगला प्रतिसाद; आता 'या' पक्षाने दिला पाठिंबा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आता होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना आमचा पक्ष पाठिंबा देईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतची पोस्टही त्यांनी ‘एक्स’वर केली.

ओवैसी म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांना निवडणुकीत जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. एआयएमआयएम हैदराबादी आणि आदरणीय कायदेतज्ज्ञ असलेल्या जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा देईल. मी जस्टिस रेड्डी यांच्याशीही बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या’, असेही त्यांनी सांगितले.

तेजस्वी यादव यांनीही दिला पाठिंबा

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा दिला. बी. सुदर्शन रेड्डी जी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. त्यांना आमच्या सर्व खासदारांचा पाठिंबा असेल. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की, ते संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करतील आणि सभागृह (राज्यसभा) अधिक प्रभावीपणे चालवतील. सध्याच्या काळाची मागणी अशी आहे की, अशा व्यक्तीची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करावी, जी संविधानाचे रक्षण करू शकेल आणि सर्वांसोबत एकत्र काम करू शकेल.’

लोकसभा-राज्यसभेचे खासदार करतात मतदान

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 68 मतदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता कोणाला आघाडी मिळणार याची उत्सुकता कायम होती. धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीची घोषणा झाली. संख्याबळ पाहिल्यानंतर एनडीएने सी. पी. राधाकृष्णन विजयी होतील, असे चित्र वाटत होते. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र दिसत होते

Web Title: Sudarshan reddy is getting good response from opposition parties in vice president election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • C. P. Radhakrishnan
  • indian politics
  • political news
  • Vice President Election

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ज्यांची हकालपट्टी केली आता त्यांचीच ‘घरवापसी’ केली
1

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ज्यांची हकालपट्टी केली आता त्यांचीच ‘घरवापसी’ केली

Vice President Election : सी. पी. राधाकृष्णन यांना मोठा धक्का बसणार? राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जड
2

Vice President Election : सी. पी. राधाकृष्णन यांना मोठा धक्का बसणार? राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जड

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव
3

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा
4

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.