गेल्या अनेक दिवसापासुन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering case) तिचं नाव समोर आलं होतं. नुकंतचं जॅकलीन तिच्यावरील तिच्यावरी सर्व गुन्हे आणि इतर चार्जशीट रद्द (chargesheet filed by ED) करण्याचं याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणी नवी पण धक्कादायक बाब समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) आता जॅकलिन फर्नांडिसचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि सुकेशने असं का म्हण्टलं जाणून घ्या.
[read_also content=”कर्नाटकातील हिजाबवरील बंदी उठवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा! https://www.navarashtra.com/india/hijab-ban-lifted-in-karnataka-by-cm-siddaramaiah-nrps-491397.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश तुरुंगातुन जॅकलिनला पत्र लिहीत होता. मात्र, चंद्रशेखरला कोणतेही पत्र देण्यापासून रोखावे, अशी विनंती जॅकलिन फर्नांडिसने न्यायालयात केली होती. ही बाब कळताच, चंद्रशेखर यांनी तुरुंगातूनच आपले वक्तव्य जारी केले आहे. जॅकलीन फर्नांडिसच्या या वागण्यावर आश्चर्यचकित होऊन सुकेश चंद्रशेखर यांनी धमकीचे वक्तव्य केले असून नाव न घेता पत्रही लिहिले आहे. तर, आता त्याने जॅकलीनविरोधात पुरावे देणारं असल्याचं सांगितलं आहे. सुकेशने त्यांची चॅट, स्क्रीनशॉट, रेकॉर्डिंग, परदेशी गुंतवणूक आणि व्यवहार पुरावा म्हणून सादर करण्याचे ठरवले आहे.
सुकेश चंद्रशेखर यांनी हेन्ड्रिटनच्या एका पत्रात लिहिले आहे: मी माझ्या स्वप्नातही याची अपेक्षा केली नव्हती परंतु मला वाटते की “हृदय” नेहमी तुटण्यासाठी असते. भावना कोणासाठीही खूप महत्वाची आहे परंतु आपण कोणालाही आपल्यावर वार करू देऊ शकत नाही किंवा आपल्याला हलके घेऊ शकत नाही. त आणि बळी म्हणून वागतात आणि दोषारोपाचा खेळ सुरू करतात आणि म्हणतात बघ तो सैतान आहे.
सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, जॅकलिन फर्नांडिसच्या कृतीने तो सैतान बनला आहे आणि यामुळे वास्तव समोर आणण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे तुटलेल्या मनाने मी ठरवले आहे की मी दुखावणार नाही, सुन्न होणार नाही किंवा गप्प राहणार नाही, सत्य हे खूप शक्तिशाली आहे हे जाणून घेतले पाहिजे. आता वेळ आली आहे, जगाला सत्य, वास्तव जाणून घेण्याची गरज आहे आणि आता मी काहीही उघड करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. त्याच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत गुप्त ठेवलेले सर्व न पाहिलेले पुरावे तो न्यायालय आणि यंत्रणांसमोर सादर करणार आहे.