Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waqf Amendment Act SC Hearing : मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक तुर्तास स्थगिती

Waqf Board Amendment Temporarily Stayed SC : नवीन वक्फ बोर्ड कायदा सुप्रीम कोर्टाकडून स्थगित करण्यात आला आहे. कायद्यातील दोन कलमांवर स्थगिती आणण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2025 | 06:05 PM
आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक Waqf Amendment Act मांडण्यात आले होते. लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित देखील करण्यात आले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केल्यामुळे याचे कायद्यामध्ये रुपांतर झाले होते. मात्र याव विरोधात कॉंग्रेस पक्षासह देशभरातून विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.  या सर्व याचिकांचा सुप्रीम कोर्टामध्ये एकत्र सुनावणी पार पडली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हा मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत केंद्र सरकारला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. वक्फ बोर्ड सुधारित कायद्याबाबत 5 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. वक्फ बोर्ड सुधारित कायद्याच्या विरोधात विरोधी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. वक्फ बोर्डच्या विरोधात 70 हून अधिक याचिका दाखल करण्यात आले आहे. यावर एकत्रित सुनावणी पार पडली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वक्फ बोर्डच्या कायद्यानुसार पहिली कारवाई करण्यात आली. मध्यप्रदेशमध्ये ही पहिली कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशातील पन्ना याठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासनाने सरकारी जमिनीवर बांधलेला बेकायदेशीर मदरसा पाडण्यात आला आहे. या मदरशावर बुलडोझर वापरला जाणार होता, पण बुलडोझर वापरण्यापूर्वीच, संचालकाने स्वतः मदरसा पाडला. मुस्लिम समुदायानेच सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या मदरशाची तक्रार केली होती. त्याची चौकशी केली असता तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, अब्दुल रौफ कादरी हा बाहेरचा माणूस आहे. तो १० वर्षांपूर्वी इथे आला होता. त्याने ही जागा ताब्यात घेतली आणि सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे मदरसा बांधला. त्याने गरीब मुलांच्या नावाने देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नवीन वक्फ बोर्ड कायद्यानुसार, किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय. वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून ते जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना असतील. तसेच केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी बिगरमुस्लिम असावेत. बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल. केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्फची नोंदणी केली जाईल.मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख दुरुस्त्यांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

Web Title: Supreme court gave interim stay on waqf board amendment bill breakthrough for modi government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Supreme Court of India
  • waqf Act
  • Waqf Amendment Bill
  • Waqf Board Amendment Bill

संबंधित बातम्या

भावाला वाचवण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या; म्हणाल्या, “कोण खरे भारतीय हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही
1

भावाला वाचवण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या; म्हणाल्या, “कोण खरे भारतीय हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही

Banke Bihari Mandir in SC :”हे एक खाजगी मंदिर आहे…; बांके बिहारी मंदिराची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पडली पार
2

Banke Bihari Mandir in SC :”हे एक खाजगी मंदिर आहे…; बांके बिहारी मंदिराची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पडली पार

सुप्रीम कोर्टात 26 कोर्ट प्रोग्रामर पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
3

सुप्रीम कोर्टात 26 कोर्ट प्रोग्रामर पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

विचार करा…! देशात सुप्रीम कोर्टच नसते तर? प्रत्येकाने संविधानाच्या आधाराने केली असती मनमानी
4

विचार करा…! देशात सुप्रीम कोर्टच नसते तर? प्रत्येकाने संविधानाच्या आधाराने केली असती मनमानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.