Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पतंजली’ला सुप्रिम कोर्टाचा दणका; या जाहिराती बंद करण्याचे आदेश

पतंजली आयुर्वेद कंपनीने चुकीच्या दाव्यासह जाहिराज प्रसिद्ध केल्यामुळे पतंजली कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 28, 2024 | 01:05 PM
‘पतंजली’ला सुप्रिम कोर्टाचा दणका; या जाहिराती बंद करण्याचे आदेश
Follow Us
Follow Us:

दिल्ली : कमी वेळामध्ये भारतीय बाजारामध्ये मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या पतंजली कंपनीला सुप्रिम कोर्टाचा दणका बसला आहे. पतंजली आयुर्वेद कंपनीने चुकीच्या दाव्यासह जाहिराज प्रसिद्ध केल्यामुळे पतंजली कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा केली आहे.

पंतजली आयुर्वेद कंपनीने 10 जुलै 2022 रोजी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात अर्ध्या पानावर औषधांबाबत जाहिरात दिली होती. यामध्ये “अ‍ॅलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वत:ला व देशाला फार्मा व मेडिकल क्षेत्रातून होणाऱ्या अपप्रचारापासून वाचवा”, असा मथळा देण्यात आला होता. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात याचिका दाखल केली. त्यात पतंजली आयुर्वेदकडून अ‍ॅलोपॅथी व आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत अपप्रचार केला जात असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आरोप करण्यात आला. पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँण्ड ऑदर मॅजिक रेमेडिज अ‍ॅक्ट, 1954 व ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे थेट उल्लंघन केले जात असल्याचे देखील इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले. तसेच करोना महामारीच्या वेळी बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा देखील उल्लेख रिट याचिकेत करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाने पंतजली समुहाला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल 21 नोव्हेंबर 2023 रोजी खडसावले होते. त्यानंतर देखील पुन्हा एकदा 4 डिसेंबर 2023 रोजी पंतजली आयुर्वेदने ‘द हिंदू’या वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरून सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला सुनावले आहे. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला स्वतः वृत्तपत्रासह सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी पोहोचले. वृत्तपत्रावर जाहिरात दाखवताना त्यांनी पतंजली आयुर्वेदला विचारले की, न्यायालयाच्या आदेशानंतरही ही जाहिरात आणण्याची हिंमत तुमच्यात कशी काय आली? न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याबद्दल कारवाई का करु नये, अशी विचारणा देखील सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच पतंजली आयुर्वेदच्या ड्रग्ज अँण्ड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिरात) अ‍ॅक्टमध्ये नमूद केलेल्या औषधांच्या जाहिरातींवर बंदी आणली जाईल असे न्यायालयाने सांगितले.

Web Title: Supreme court hits patanjali ayurveda order to stop these advertise nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
1

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
2

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.