Suprme Court On Influencers: दिव्यांग नागरिकांचा अपमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने इन्फ्ल्यूएर्सना चांगलेच झापले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. इन्फ्ल्यूएर्सना सुप्रीम कोर्टाने माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणानंतर कोर्टाने यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे असे म्हटले आहे. समय रैना आणि 5 जणांना कोर्टाने माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.
कॉमेडीयन समय रैना, विपुन गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर, निशांत तंवर यांच्यावर दिव्यांग आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. दरम्यान त्यांच्या याबाबतच्या व्हिडिओविरुद्ध क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती.
कॉमेडीयन्सनी केलेल्या विधानामुळे पीडित नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात तसेच, समाजात अपांगत्व आणि आजारांबद्दल चुकीची धारणा तयार होते, असे या याचिकेत संस्थेने म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणी
सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठपुढे सुनावणी पार पडली. सुनावणी करताना खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने 5 जणांकडून माफी मागवून घेतली. तसेच या 5 ही जणांनी आपापल्या यूट्यूब चॅनेल तसेच अन्य सोशल मीडिया अकाऊंटवरून माफी मागावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच भविष्यात अशी चूक करू नये असेही कोर्टाने सांगितले.
सुप्रीम कोर्टात आज सुनावणीदरम्यान 5 ही कॉमेडीयन्स हजर होते. त्यांनी कोर्टात हजर राहून माफी मागितली. त्यामुळे कोरताजणे त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट दिली आहे. यामुळे त्यांना आता वारंवार कोर्टात हजर राहावे लागणार नाहीये. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशी प्रकरणे थांबवण्यासाठी नवीन मार्गदर्शक प्रणाली तयार करत असल्याचे देखील सांगितले. सुप्रीम कोर्टाने याबाबत सुनावणी घेत असताना या प्रकरणाचा संबंध “इंडियाज गॉट टॅलेंट शो” मधील वादाशी जोडला. ज्यामध्ये यूट्यूबर रणबीर अलाहाबदियावर अपमानास्पद विधाने केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Ranveer Allahbadia: रणवीरने पोलिसांसमोर स्वतःची चूक केली मान्य; म्हणाला- ‘मी समयसाठी या शोमध्ये…’
रणवीरने पोलिसांसमोर स्वतःची चूक केली मान्य
युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवर अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान रणवीर महाराष्ट्र सायबर पोलिसांसमोर हजर झाला, जिथे त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता. यावेळी त्याने आपली चूक मान्य केली आणि वादग्रस्त विधान करून चूक केल्याचे सांगितले होते.