पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?
तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Tiktok बद्दल आठवतंय का? Tiktok एक असं प्लॅटफॉर्म होतं जे 2020 मध्ये भारत सरकारने बॅन केलं होतं. हा एक चीनच्या मालकीचा अॅप आहे, जिथे युजर्स त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करू शकत होते. 2020 मध्ये झालेल्या वादामुळे भारत सरकारने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Tiktok वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, Tiktok चे भारतात पुनरागमन होणार आहे. ही चर्चा सुरू होण्यामागील कारण देखील तसेच आहे. 2020 मध्ये बंदी घातल्यानंतर आता पहिल्यांदाच Tiktok चे भारतात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतातील टिकटॉक युजर्समध्ये एक अशा निर्माण झाली आहे.
जून 2020 मध्ये शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok वर बंदी घालण्यात आली. मात्र आता हे प्लॅटफॉर्म काही यूजरसाठी अचानक एक्सेसिबल झाले आहे. या बदलांमुळे लोकांमध्ये आश्चर्य आणि आशा दोन्ही निर्माण झाले आहे. मात्र अद्याप Tiktok च्या भारतातील पुनरागमनबद्दल कोणहिती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tiktok वेबसाईट अचानक लाईव्ह झाल्याने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेव्हा अनेकांनी स्मार्टफोन आणि लॅपटॉप दोन्हींवर Tiktok ची वेबसाईट ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र सर्वच युजर्सना हे शक्य झाले नाही. याबाबत अनेक युजर्सनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की, त्यांनी Tiktok वेबसाईटला भेट दिली मात्र त्यांच्यासाठी अद्याप पेज लोड होत नाही. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जाऊ शकतो की ही सुविधा काही विशिष्ट प्रदेशांपुरती मर्यादित आहे किंवा मर्यादित चाचणीचा भाग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, Tiktok अॅप अद्याप भारतात गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही.
वेबसाईट लाईव्ह झाल्यानंतर आता लोकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला आहे की हे अॅप पुन्हा भारतात एंट्री करू शकते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने अद्याप Tiktok वरील बंदी उठवली नाही. सुमारे 5 वर्षांपूर्वी, चीनसोबतच्या सीमा तणावामुळे भारत सरकारने Tiktok सह अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सरकारने म्हटले होते की हे अॅप्स भारताच्या सार्वभौमत्वासाठी, एकतेसाठी, सुरक्षिततेसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत.
भारताप्रमाणेच अमेरिकेत देखील Tiktok बॅन करण्यात आले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे म्हणणं आहे की, अमेरिकन खरेदीदार हे अॅप खरेदी करण्यास तयार आहे. खरं तर, अमेरिकेने हे अॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली होती. मात्र आता या अॅपची वेबसाईट पुन्हा एकदा लाईव्ह झाली आहे. त्यामुळे आता भारतात पुन्हा एकदा 2019 चा काळ परतणार का, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.