वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्...; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
Social Media Viral Video: हल्लीच्या काळात आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना पाहतो. एक चांगला मनुष्य कायमच दुसऱ्या चांगल्या मनुष्यच्या मदतीसाठी तयार असतो. माणूस माणसाच्या मदतीसाठी तयार असतो. त्याला अडचणीच्या काळात मदतीचा हात देतो. तसेच प्राण्यांचे देखील आहे. प्राणी देखील एकमेकांना अडचणीच्या काळात मदत करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर मग या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात.
सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या गजराजाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो एक हरणाची मदत करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट देखील केल्या आहेत. या व्हिडिओत नक्की काय आहे, ते पाहुयात.
प्राण्यांमध्ये देखील एकमेकांना मदत करण्याची भावना असते, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. जर ही भावना फक्त माणसांमध्ये असते असे वाटत असेल तर, ते चुकीचे आहे. प्राण्यांमध्ये देखील एकमेकांना मदत करण्याची भावना असते, एवढे मात्र नक्की. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चिमुकला गजराज हरणाच्या पिल्लाला पाण्यात बुडण्यापासून वाचवताना दिसून येत आहे.
Elephant saving a Gazelle, animal life is amazing.
#viral #crazy #wild #crazyvideos pic.twitter.com/9hYMwKUK9E
— Crazy Fcking Videos (@CrazyFnVideos) July 20, 2025
चिमुकला गजराज आपल्या सोंडेच्या मदतीने हरणाच्या पिलाला वाचवताना दिसून येत आहे. हत्ती आपल्या सोंडेने त्या पिलाला पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहे. चिमुकल्या गजराने त्या हरणाच्या पिलाला आपल्या सोंडेत उचलले आणि पाण्याच्या बाहेर काढले. हा व्हिडीओ @CrazyFnVideos या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
चिमुकला पिंजऱ्यात पडताच क्षणाचाही विलंब न करता हत्तीने त्याला सोंडेने उचलले
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यात एक लहान मुलगा प्राणीसंग्रहालयातील हत्तींच्या पिंजऱ्यात चुकून पडला आहे. त्याला असे पडलेले पाहताच वर उभे असलेले सर्व लोक घाबरतात आणि त्याला वाचवण्यासाठी धडपड करू लागतात पण तितक्यातच एक हत्ती हुशारीने तिकडे येतो आणि खाली पडलेल्या मुलाला आपल्या सोंडेने वर उचलत त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करतो.
हत्ती सारख्या प्राण्यामध्येही माणुसकी शिल्लक आहे आणि त्याने उचललेले हे मदतीचे पाऊल खरोखर प्रशंसेस पात्र आहे. लोकांना हे दृश्य इतके आवडले की त्यांनी लगेच आपल्या फोनच्या कॅमेरात त्याला कैद करून हे दृश्य सोशल मीडियावर शेअर केले. व्हिडिओ पाहताच युजर्स हत्तीच्या उदारतेवर चांगलेच खुश झाले असून वेगाने हा व्हिडिओ आता शेअर केला जात आहे.