Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांनी केले ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण, डिजिटल जाहिरातींचं नव्याने ठरतंय भविष्य

भारतामधील सर्वात मोठ्या मल्टी-प्लॅटफॉर्म रिसर्चने हे सिद्ध केले आहे की खरे लक्ष हे व्यवसायाच्या यशासाठी आणि Gen Zच्या संलग्नतेसाठी सर्वात मोठे घटक आहे. त्यामुळे भारतातील डिजिटल जाहिरातींचे भविष्य नव्याने ठरवले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2025 | 03:45 PM
Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांनी केले ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण, डिजिटल जाहिरातींचं नव्याने ठरतंय भविष्य

Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांनी केले ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण, डिजिटल जाहिरातींचं नव्याने ठरतंय भविष्य

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या Gen Z युथमध्ये Snapchat ची प्रचंड क्रेझ आहे. हे प्लॅटफॉर्म केवळ फोटोंसाठीच नाही तर मेसेजिंगसाठी देखील वापरले जाते. या लोकप्रिय प्लॅटफॉर्म Snapchat ने जागतिक मीडिया एजन्सी WPP मीडिया आणि अटेंशन मोजणारी आघाडीची संस्था Lumen यांच्यासोबत भागीदारी करत ‘Attention Advantage’ नावाचा भारतातील सर्वात मोठा अटेंशन रिसर्च सादर केला आहे. या रिसर्चमधून डिजिटल जाहिरातींना मोजण्याची एक नवीन पद्धत, नवीन मापदंड आणि Gen Z ला प्रभावीपणे टार्गेट करण्याचा नवीन मार्ग सुचवण्यात आला आहे. यामुळे आता असा अंदाज आहे की, भारतातील डिजिटल जाहिरातींचे भविष्य नव्याने ठरवले जाणार आहे. या अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की जाहिरातींकडे खरे लक्ष दिले गेले की त्याचा व्यवसायावर थेट परिणाम होतो.

OnePlus Nord 5 vs Realme 15 Pro 5G: मिड रेंजमध्ये कोण आहे खरा बादशाह? तुमच्यासाठी कोणतं डिव्हाईस ठरणार बेस्ट?

हा रिसर्च खूप महत्त्वाच्या वेळेस आला आहे. भारतातील 377 दशलक्ष Gen Z लोक मिळून 2035 पर्यंत 2 ट्रिलियन डॉलर खर्च करू शकतील असा अंदाज आहे. Gen Z लोकं लक्ष वेधून न घेणाऱ्या जाहिरातींना ते लगेच स्किप करतात. ‘Attention Advantage’ रिसर्च म्हणजे खरे काय याबाबत जाणून घेऊया.

3,000 पेक्षा जास्त भारतीय सहभागींच्या डेटावर आधारित, Lumen च्या खास टेक्नॉलॉजीने विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हिज्युअल अटेंशन मोजले. WPP मीडिया अंतर्गत विविध ब्रँड्सनी जसे की FMCG, ऑटो, फॅशन आणि QSR यांनी एकाच मोहिमेअंतर्गत जाहिराती चालवल्या आणि काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले. यातील काही निष्कर्षांबद्दल आता जाणून घेऊया.

महत्त्वपूर्ण निष्कर्ष जाणून घ्या

  • फक्त 5% लक्ष वाढवले तरी ब्रँडच्या इमेजमध्ये 2 पट वाढ होऊ शकते
  • View Through Rate (VTR) पेक्षा Attention 8 पट जास्त प्रभावी आहे
  • 1 सेकंद लक्ष स्मरणशक्तीसाठी चालते, पण खरे कनेक्शन तयार करण्यासाठी 3 सेकंद लागते
  • 9 सेकंदानंतर फायदा कमी होतो
  • ही मेट्रिक्स ब्रँड्सना अटेंशन-बेस्ड मीडिया प्लॅनिंगसाठी एक ठोस फ्रेमवर्क देतात.

Mike Follett, CEO, Lumen Research म्हणाले, “आमची टेक्नॉलॉजी ‘दृश्य नसलेले’ गोष्टी स्पष्ट करते. हा अभ्यास सिद्ध करतो की खरे मानवी लक्ष हेच व्यवसायिक यशाचे सर्वात मोठे भविष्यवाणी करणारे घटक आहे. Snapchat सारख्या प्लॅटफॉर्मवर अटेंशन पातळी पारंपरिक प्लॅटफॉर्म्सपेक्षा 2 पट जास्त आहे.”

Amin Lakhani, प्रेसिडेंट, क्लायंट सोल्यूशन्स, WPP मीडिया यांनी सांगितलं की, “आमच्या क्लायंट्सना नेहमी गुंतवणुकीवर स्पष्ट रिटर्न पाहिजे असतो. हा अभ्यास आमच्यासाठी एक अटेंशन प्लेबुक घेऊन आला आहे. ज्यामुळे आम्ही चांगल्या व अधिक प्रभावी मीडिया योजना तयार करू शकतो.”

Amit Chaubey, हेड ऑफ मार्केटिंग सायन्स, Snap Inc. APAC यांनी सांगितलं की, “आजच्या डिजिटल युगात ‘attention’ ही फक्त चांगली गोष्ट नाही, तर ती प्रभावी जाहिरातींसाठी सर्वात महत्त्वाचा मापदंड आहे. ‘Attention Advantage’ फक्त लक्षाचे महत्त्व सांगत नाही, तर ब्रँड्सना एक व्यावहारिक प्लॅन देतो ज्याच्या मदतीने ते लक्ष मिळवू शकतात आणि ते व्यवसायिक यशात बदलू शकतात.”

Snapchat Advantage: Gen Z चं लक्ष खेचणारा प्रमुख प्लॅटफॉर्म पारंपरिक सोशल प्लॅटफॉर्म्सवर Gen Z 34% कमी लक्ष देते, पण Snapchat वर ते अत्यंत अ‍ॅक्टिव्ह असतात. Snapchat वर अटेंशन 2 पट जास्त आहे. AR Lenses हे सर्वात प्रभावी फॉर्मॅट आहेत. हे इतर कोणत्याही फॉर्मॅटपेक्षा 2x जास्त अ‍ॅक्टिव अटेंशन मिळवतात. Snapchat मीडिया मिक्समध्ये जोडल्याने Gen Z लक्षात 22% पर्यंत वाढ होऊ शकते.

Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकवर चोरांची नजर, संधी मिळताच केलं असं… क्षणातच लुटले 91 करोड रुपयांचे डिव्हाईस

The Attention Playbook: ब्रँड्ससाठी तीन महत्वाचे टीप्स. पहिलं योग्य प्लॅटफॉर्म निवडा. Gen Z जेथे अ‍ॅक्टिव्ह आहे तिथेच ब्रँड्सनी उपस्थित राहावे. दुसरं फॉर्मॅट महत्त्वाचा आहे. Non-skippable व्हिडिओ आणि AR लेंसचा संगम सर्वात चांगले परिणाम देतो. तिसरं Authentic UGC स्टाइल, ब्रँडिंग आणि आकर्षक म्युझिकसह क्रिएटिव्ह लक्ष वेधून घेतात आणि Gen Z शी चांगला कनेक्शन तयार करतात.

Web Title: Snapchat wpp and lumen unveiled attention advantage research tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.