
Supreme Court said both Hindu pooja and Muslim namaz offered at Bhojshala mp
हिंदू आणि मुस्लिम गटांनी शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी भोजशाळा संकुलात धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी मागितली होती. वसंत पंचमीनिमित्त त्याच दिवशी सरस्वती पूजा देखील होणार आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांना परस्पर आदर आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. खंडपीठाने जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, वादग्रस्त भोजशाळेत नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या लोकांची संख्या जिल्हा प्रशासनाला कळवावी.
हे देखील वाचा : गुरुवार ठरला घातवार! Indian Army चे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले, १० जवान शहीद; 7 जखमी
हिंदू समाजातील लोक हे मध्यप्रदेशमधील भोजशाळेला देवी सरस्वतीचे मंदिर मानतो, तर मुस्लिम समाज त्याला कमल मौला मशीद म्हणतो. ७ एप्रिल २००३ रोजी जारी केलेल्या एएसआयच्या आदेशानुसार, हिंदूंना दर मंगळवारी भोजशाळेत पूजा करण्याची परवानगी आहे, तर मुस्लिम दर शुक्रवारी तेथे नमाज अदा करू शकतात. ही व्यवस्था गेल्या २३ वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी शुक्रवारी येणारी वसंत पंचमी प्रशासनासाठी आव्हान निर्माण करणारी ठरली. मात्र यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देत दोन्ही समाजाच्या भावनांचा आदर राखला आहे.
हे देखील वाचा : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा
यापूर्वी, २०१६ मध्ये, वसंत पंचमी शुक्रवारी होती. त्यावेळी भोजशाळेत नमाज आणि प्रार्थनेच्या वेळेवरून वाद झाला होता, ज्यामुळे स्थानिक निदर्शने आणि संघर्ष निर्माण झाले होते. यावेळी, प्रशासनाने आधीच तेथे सुरक्षा वाढवली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे दोन्ही समुदायांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे.
काय आहे भोजशाळा वाद?
हिंदू समाज भोजशाळेला ११ व्या शतकातील वाग्देवी (सरस्वती देवी) चे मंदिर मानतात, तर मुस्लिम समुदाय या वास्तूला कमाल मौला मशीद म्हणतो. २००३ च्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या आदेशानुसार, मुस्लिमांना या ठिकाणी दुपारी १ ते ३ या वेळेत शुक्रवारची नमाज अदा करण्याची परवानगी आहे, तर हिंदूंना वसंत पंचमीला पारंपरिक विधी करण्याची आणि प्रत्येक मंगळवारी विशेष प्रवेशाची परवानगी आहे. तथापि, ज्या वर्षी वसंत पंचमी शुक्रवारी येते, त्या वर्षासाठीच्या व्यवस्थेबद्दल त्यात काहीही नमूद केलेले नाही. २००६, २०१३ आणि २०१६ नंतर २३ जानेवारी हा असा चौथा योगायोग आहे.