विवाहबाह्य संबंधात नवऱ्याच्या प्रेयसीवर 'या' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही; 'SC' चा मोठा निर्णय
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्ट देशाचे सर्वोच्च न्यायमंदिर आहे. सुप्रीम कोर्ट अनेक प्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत असते. सुप्रीम कोर्टाने आज एका महत्वाच्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. विवाहबाह्य संबंध प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. एक विवाहबाह्य संबंध प्रकरणात असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अशा प्रकरणात विवाहबाह्य संबंध असलेल्या विवाहितेवर किंवा प्रेयसीवर गुन्हा दाखल करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हे प्रकरण नक्की काय ते जाणून घेऊयात.
सुप्रीम कोर्टात एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यावर सुनावणी करताना हा निर्णय कोर्टाने दिला आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रेयसीवर किंवा विवाहितेवर फौजदारी गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टानेk म्हंटले आहे. विवाहबाह्य संबंधात असलेली महिला स्त्री कलम 498 ए आयपीसी अंतर्गत ‘नातेवाईक’ या व्याख्येच्या कक्षेत येत नाहीत, असे निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.
सुप्रीम कोर्टात दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे या महिलेने पतीच्या प्रेयसीवर आरोप करत तिच्यावर फौजदारी गुहा दाखल केला होता. मात्र सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने असा गुन्हा दाखल करता येणार नाही म्हणत हा गुन्हा रद्द केला आहे.
ब्रेकअप झाल्यास पुरुषावर अत्याचाराचा गुन्हा…’; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
पुरुष आणि स्त्री यांच्या नात्याबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. पुरुष आणि महिलेचे प्रेम संबंध आहेत आणि त्यांनी दिलेले लग्नाचे वचन मोडले किंवा ते वचन पूर्ण केले नाही तर, पुरुषावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. एक प्रकरणावर सुयनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पुरुष आणि महिलेचे सहमतीने प्रेमसंबंध असतील आणि ब्रेकअप झाले तर त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करता येणार नाही असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
हेही वाचा: Supreme Court: ‘ब्रेकअप झाल्यास पुरुषावर अत्याचाराचा गुन्हा…’; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करत असताना हा निर्णय दिला आहे. पुरुष आणि महिलेमध्ये सहमतीने प्रेमसंबंध असतील आणि लग्नाचे दिलेले वचन त्याने मोडले किंवा पूर्ण केले नाही तर तो अत्याचराचा गुन्हा ठरत नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराबद्दल तक्रार दाखल केली होती. प्रियकराने लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली होती. मात्र या प्रकरणात सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने तरुणाला दिलासा दिला आहे. परस्पर सहमतीने रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये ब्रेकअप झाले तर एखाद्या पुरुषाविरुद्ध फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.