Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?

Supreme Court of India: न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी असलेल्या कॉलेजियम व्यवस्थेवर (Collegium System) झालेल्या युक्तिवादावर भाष्य करताना, 'केवळ न्यायाधीशच न्यायाधीशांची नियुक्ती करतात' हा समाज आणि माध्यमांमध्ये पसरवला जाणारा एक मोठा गैरसमज असल्याचे न्यायमूर्ती दत्ता यांनी स्पष्ट केले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 23, 2026 | 05:15 PM
Supreme Court, Election Commissioner Appointment, CJI Inclusion,

Supreme Court, Election Commissioner Appointment, CJI Inclusion,

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेत सरन्यायाधीशांच्या (CJI) समावेशावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.
  • न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाचा विभागलेला (Split) निर्णय.
  • प्रकरण ५ न्यायाधीशांच्या स्थायी संविधान पीठाकडे सोपवण्याची शक्यता तपासण्याची CJI कडे विनंती.
ECI Appointment Case Supreme Court:  केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या (Election Commissioners) नियुक्ती प्रक्रियेत भारताच्या सरन्यायाधीशांचा (CJI) समावेश करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाचा विभागलेला (Split Verdict) निर्णय समोर आला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी वेगवेगळी मते मांडली.

संवैधानिक मुद्द्यांचा विचार करण्यासाठी पाच न्यायाधीशांचे स्थायी खंडपीठ स्थापन करण्याची शक्यता तपासली जावी, अशी विनंती दोन्ही न्यायमूर्तींकडून सरन्यायाधीशांना करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारनेही हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे सोपवण्याची मागणी केली होती.

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता काय म्हणाले?

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी हे प्रकरण थेट पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे पाठवण्याची मागणी मान्य करण्यास नकार दिला. मात्र, या विषयावर पुढील सुनावणीसाठी प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी असलेल्या कॉलेजियम व्यवस्थेबाबत करण्यात आलेल्या युक्तिवादावरही त्यांनी भाष्य केले. केवळ न्यायाधीशच न्यायाधीशांची नियुक्ती करतात, असा गैरसमज पसरवला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

न्यायमूर्ती दत्ता म्हणाले की, नियुक्ती प्रक्रियेत केंद्र आणि राज्य सरकारांशी चर्चा केली जाते तसेच गुप्तचर यंत्रणांकडून अहवालही घेतले जातात. एक-दोन नियुक्त्यांवरून संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

‘निवडणूक आयुक्तांची निष्पक्ष निवड आवश्यक’

निवडणूक आयोगाची निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांची निष्पक्ष निवड होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता.

पंतप्रधानांसोबत त्यांच्या नामनिर्देशित प्रतिनिधीचा निवड समितीत समावेश असल्यास निवड प्रक्रिया सरकारच्या बाजूने झुकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवादही करण्यात आला. तसेच तीन सदस्यीय समितीमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका केवळ औपचारिक ठरू शकते, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना

या युक्तिवादात तथ्य असल्याचे न्यायमूर्ती दत्ता यांनी म्हटले.

न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांचे वेगळे मत

तर न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी आपला आदेश वाचताना न्यायमूर्ती दत्ता यांच्या मताशी असहमती व्यक्त केली.

मागील निर्णयाच्या वेळी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात स्पष्ट व्यवस्था नसल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी न्यायालयाने पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीची तरतूद केली होती, असे न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केले.

मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. संसदेकडून यासंदर्भात कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवण्यात यावे आणि त्यांनी पाच न्यायाधीशांचे संविधान पीठ स्थापन करावे, असे मत न्यायमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केले.

प्रकरण CJI कडे सोपवण्याचे मत

मतभेद असले तरी हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी सरन्यायाधीशांकडे सोपवणे योग्य ठरेल, असे न्यायमूर्ती दत्ता यांनीही म्हटले. संविधान पीठाकडे पाठवण्यात आलेली प्रकरणे अनेकदा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, अशी चिंता याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, या प्रकरणाची लवकर सुनावणी होईल, अशी अपेक्षा असल्याचे न्यायमूर्ती दत्ता यांनी नमूद केले.

 

 

Web Title: Supreme court split verdict on cji inclusion in election commissioner appointment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Election Commission
  • Supreme Court

संबंधित बातम्या

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
1

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
2

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

TMC Symbol History: ममता बॅनर्जींच्या वर्मावर घाव; स्वतः रेखाटलेल्या ‘तृणमूल’चे चिन्हाची खास कहाणी
3

TMC Symbol History: ममता बॅनर्जींच्या वर्मावर घाव; स्वतः रेखाटलेल्या ‘तृणमूल’चे चिन्हाची खास कहाणी

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
4

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.