Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘दत्तक’ घेणाऱ्या मातांनाही मिळणार प्रसूती रजेचा हक्क!

सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांसाठी मातृत्व रजेची ३ महिन्यांची वयोमर्यादा हटवली आहे. आता दत्तक घेणाऱ्या महिलांनाही पूर्ण १२ आठवड्यांची रजा मिळणार असून पितृत्व रजेवरही धोरण आणण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 17, 2026 | 05:52 PM
Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय (Photo Credit - X)

Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
  • ‘दत्तक’ घेणाऱ्या मातांनाही मिळणार प्रसूती रजेचा हक्क!
  • जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय
नोकरी करणाऱ्या महिलांच्या हक्कांच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. मूल दत्तक घेणाऱ्या मातांनाही आता जैविक मातांप्रमाणेच पूर्ण मातृत्व रजेचा (Maternity Leave) अधिकार असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दत्तक घेतलेल्या मुलाचे वय ३ महिन्यांपेक्षा जास्त असले तरीही मातांना १२ आठवड्यांची रजा नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल न्यायालयाने केला आहे.

२०२० च्या कायद्यातील ‘ती’ तरतूद असंवैधानिक

न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना ‘सामाजिक सुरक्षा संहिता २०२०’ मधील कलम ६०(४) ला असंवैधानिक घोषित केले आहे. या जुन्या तरतुदीनुसार, केवळ ३ महिन्यांपेक्षा कमी वयाचे बाळ दत्तक घेतल्यास महिलांना मातृत्व लाभाचा अधिकार होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही अट भेदभाव करणारी असल्याचे ठरवले आहे. ३ महिन्यांपेक्षा जास्त वयाचे मूल दत्तक घेतले तरी त्या मातेची जबाबदारी कमी होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

वयाची अट का हटवली?

प्रसूती रजा देण्यास नकार देणे हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठाने स्पष्ट केले की, ३ महिन्यांपेक्षा जास्त वयाचे मूल दत्तक घेतल्यावरही त्या मुलाशी भावनिक नाते (Emotional Connection) जोडण्यासाठी आणि त्याच्या संगोपनासाठी मातेला वेळेची गरज असते. मातेने मुलाला जन्म दिला असो किंवा दत्तक घेतले असो, दोन्ही मातांचे हक्क समान आहेत. मुलाच्या वयावर मातेचे हक्क अवलंबून असू शकत नाहीत.

Period Paid Leave : मासिक पाळीमध्ये महिलांना पगारी रजा..! पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

‘पॅटर्निटी लीव’बाबतही सरकारला महत्त्वाचे निर्देश

यावेळी केवळ मातांच्याच नव्हे, तर पित्यांच्या हक्काबाबतही न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘पितृत्व रजा’ (Paternity Leave) सामाजिक सुरक्षा लाभाचा भाग म्हणून ओळखणारा कायदा आणण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी मुलांच्या संगोपनात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी पितृत्व रजेवर धोरण तयार करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.

नोकरी करणाऱ्या महिलांवर काय परिणाम होईल?

या निर्णयामुळे खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अशा हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे, ज्यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता १२ आठवड्यांची सवेतन रजा मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क असेल. मातृत्व हा केवळ शारीरिक प्रक्रियेशी संबंधित विषय नसून तो मानवाधिकाराचा भाग आहे, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.

Passive Euthnasia Case : इच्छामरण म्हणजे काय? 13 वर्षांपासून कोमात असणाऱ्या हरीश राणाची ‘मृत्यूची इच्छा’ कशी पूर्ण होणार?

Web Title: Supreme courts historic verdict on maternity leave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
1

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
2

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार
3

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
4

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.