Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महुआ मोईत्राच्या निलंबनावर स्थगिती कायम; सुप्रीम कोर्टाचा नकार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुकणार

Mahua Moitra Case  Hearing : लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयानेही त्यांना अद्याप दिलासा दिला नाही.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 03, 2024 | 03:39 PM
Supreme Court's refusal to stay the suspension of Mahua Moitra will miss the budget session

Supreme Court's refusal to stay the suspension of Mahua Moitra will miss the budget session

Follow Us
Follow Us:
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. त्यांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महुआ यांना सहभागी होता येणार नाही.
डिसेंबरमध्ये गमावले संसदेचे सदस्यत्व
या प्रकरणी आता मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. टीएमसीच्या महुआ मोईत्रा यांनी डिसेंबरमध्ये संसदेचे सदस्यत्व गमावले होते. लोकसभेच्या आचार समितीने कॅश फॉर क्वेरी म्हणजेच पैशासाठी प्रश्न विचारल्याप्रकरणी कारवाई करताना महुआचे सदस्यत्व रद्द केले होते.
लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी
तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (३ जानेवारी) महुआच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आदेश देण्यास नकार दिला.
महुआ मोइत्राच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय
न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, या टप्प्यावर महुआ मोइत्राच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणताही आदेश देण्यास नकार देत आहे. त्यांनी लोकसभेच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी मागितली आहे.
अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
न्यायालयाने लोकसभा सचिवालयाकडून उत्तर मागवले
त्याचबरोबर महुआ मोईत्रांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालयाकडून उत्तर मागितले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु टीएमसी नेत्याची मागणी फेटाळण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांना लोकसभेच्या कामकाजात काही काळ भाग घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. महुआ यांचे सदस्यत्व गमावल्यानंतर हिवाळी अधिवेशनात जवळपास 150 विरोधी खासदारांची हकालपट्टीही करण्यात आली होती. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ केला होता.
लोकसभेच्या कामकाजाचा आढावा
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने लोकसभा सचिवालयाला नोटीस बजावताना सांगितले की, एक मुद्दा म्हणजे लोकसभेच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे. लोकसभा सचिवालयाला तीन आठवड्यांत उत्तर द्यावे लागेल आणि त्यानंतर याचिकाकर्त्याची इच्छा असेल तर त्याला उत्तर दाखल करण्याचा पर्यायही असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्च 2024 रोजी होणार आहे.

Web Title: Supreme courts refusal to stay the suspension of mahua moitra will miss the budget session nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • Supreme Court
  • Trinamool Congress leader

संबंधित बातम्या

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
1

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Maharashtra Live Breaking News in Marathi: राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.