Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swaraj Kaushal Passes Away: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन, आज सायंकाळी दिल्लीत अंत्यसंस्कार

Sushma Swaraj Husband Passes Away: स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयातील एक नामवंत वकील होते. त्यांची राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द अत्यंत प्रभावी होती, ज्यात अनेक महत्त्वाच्या नोंदी आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 04, 2025 | 04:14 PM
सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन (Photo Credit - X)

सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • राजकीय आणि कायदेशीर क्षेत्राला धक्का
  • सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन
  • मिझोरम शांतता करारात महत्त्वाची भूमिका
दिल्ली: भाजपच्या दिवंगत दिग्गज नेत्या सुषमा स्वराज (Sushman Swaraj) यांचे पती आणि मिझोरामचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ विधिज्ञ स्वराज कौशल (Swaraj Kaushal) यांचे आज (४ डिसेंबर २०२५) दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयातील एक नामवंत वकील होते. त्यांची राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द अत्यंत प्रभावी होती, ज्यात अनेक महत्त्वाच्या नोंदी आहेत.

सर्वात युवा राज्यपाल होण्याचा विक्रम

१९९० मध्ये, अवघ्या ३७ वर्षांच्या वयात त्यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी ते देशातील सर्वात युवा राज्यपाल ठरले. ते ९ फेब्रुवारी १९९३ पर्यंत या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी सुषमा स्वराज यांच्या नावावरही देशातील सर्वात युवा कॅबिनेट मंत्री बनण्याचा विक्रम आहे.

सांसद एवं प्रदेश मंत्री सुश्री बांसुरी स्वराज जी के पिताजी श्री स्वराज कौशल जी का आज 4 दिसम्बर, 2025 को निधन हो गया है। उनका अंतिम संस्कार आज 4 दिसम्बर, 2025 को सायं 4.30 बजे लोधी रोड श्मशान घाट पर किया जायेगा। — BJP Delhi (@BJP4Delhi) December 4, 2025


राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द

स्वराज कौशल यांची राजकीय कारकीर्दही शानदार राहिली. १९९८ मध्ये हरियाणा विकास पक्षाचे उमेदवार म्हणून ते राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आणि १९९८ ते २००४ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. १९९८-९९ दरम्यान सुषमा स्वराज लोकसभेत आणि स्वराज कौशल राज्यसभेत होते. तर २००० ते २००४ या काळात दोघेही एकाच वेळी राज्यसभा सदस्य होते.

हे देखील वाचा: सुषमा स्वराज यांची ‘ती’ परंपरा लेकीने ठेवली कायम; सोशल मीडियावर रंगली चर्चा

मिझोरम शांतता करारात महत्त्वाची भूमिका

स्वराज कौशल हे उत्तर-पूर्व (ईशान्य) भागातील समस्यांचे मोठे जाणकार मानले जात होते. १९७९ मध्ये अंडरग्राउंड मिझो नेते लालडेंगा यांच्या सुटकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर ते मिझो नॅशनल फ्रंटचे संवैधानिक सल्लागार (Constitutional Advisor) बनले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे मिझोरम शांतता करार (Mizoram Peace Accord) तयार झाला, ज्यामुळे २० वर्षांच्या बंडाळीचा अंत झाला. याच योगदानामुळे त्यांना मिझोरामचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. आणीबाणीच्या काळात (Emergency) जॉर्ज फर्नांडिस आणि इतर २४ लोकांवर बडोदा डायनामाइट केसमध्ये (Baroda Dynamite Case) खोटे आरोप लावण्यात आले तेव्हा त्यांची कोर्टात बाजू मांडण्याचे काम स्वराज कौशल यांनी केले होते.

कायदेशीर आणि कौटुंबिक जीवन

डिसेंबर १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीनियर ॲडव्होकेट चा दर्जा दिला आणि एक वर्षानंतरच ते ॲडव्होकेट जनरल बनले. त्यांनी १३ जुलै १९७५ रोजी एबीव्हीपी कार्यकर्त्या आणि आरएसएस नेत्याची मुलगी असलेल्या सुषमा स्वराज यांच्याशी विवाह केला. त्यांची मुलगी बांसुरी स्वराज ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर असून सध्या बॅरिस्टर म्हणून दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात सक्रिय असूनही स्वराज कौशल यांनी नेहमीच एक साधे आणि लो-प्रोफाइल जीवन जगले.

हे देखील वाचा: सुषमा स्वराज यांची लेक राजकाराणाच्या मैदानात; भाजपकडून लोकसभा उमेदवारी

Web Title: Sushma swarajs husband swaraj kaushal passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Nation News
  • Supreme Court
  • Sushma Swaraj

संबंधित बातम्या

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
1

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
2

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.