Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तमिळनाडूत 35 कोटींच्या घोडेबाजाराचा आरोप; विजय सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी तिघांना अटक

तमिळनाडूत सत्ताधारी टीव्हीकेच्या आमदाराला 35 कोटी रुपयांचे आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणण्याचा कथित प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. आमदार एन. इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jul 03, 2026 | 02:41 PM
तमिळनाडूत 35 कोटींच्या कथित घोडेबाजाराचा आरोप; विजय सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी तिघांना अटक

तमिळनाडूत 35 कोटींच्या कथित घोडेबाजाराचा आरोप; विजय सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी तिघांना अटक

Follow Us
Follow Us:

देशभरातून फोडाफोडीच्या राजकारणाच्या बातम्या येत असतानाच आता तामिळनाडूतूनही सत्ताधारी आमदारांना फोडण्यासाठी कथित घोडेबाजार सुरु झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्या टीव्हीके  पक्षातील एका आमदाराला फोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर आली असल्याचे आरोप करण्यात आले आहे.

तमिळनाडूतील मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी कथित घोडेबाजाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात तमिळनाडू पोलिसांनी तिघांना अटक केली असून, माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू व्ही. अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षाचे आमदार एन. इलैयाराजा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

35 कोटी रुपयांचे आमिष दाखवल्याचा आरोप

इलैयाराजा यांनी तक्रारीत म्हंटले कि, थिरुनावुक्करसू नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून तो इंडियन पॉलिटिकल डेमोक्रॅटिक स्ट्रॅटेजीज (IPDS) या जनमत चाचणी संस्थेशी संबंधित असल्याचा दावा केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एका प्रमुख राजकीय पक्षाच्या वतीने संपर्क साधत विधानसभा अध्यक्षांविरुद्धच्या प्रस्तावावेळी विशिष्ट पद्धतीने मतदान करण्याची विनंती केली. त्याबदल्यात 35 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आल्याचा आरोप इलैयाराजा यांनी केला आहे. तसेच, ही ऑफर नाकारल्यानंतर आपल्याला धमक्या देण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

Uddhav Thacekray PC: राममंदिराच्या दानाची चोरी करून पक्ष फोडले; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप, ‘रामरक्षा आंदोलना’ची घोषणा

तिघांना अटक, अशोक कुमार यांच्याविरोधात गुन्हा

इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत थिरुनावुक्करसू आणि या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या आणखी दोघांना चेन्नईतून अटक केली.

तपासादरम्यान माजी मंत्री आणि विद्यमान आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू व्ही. अशोक कुमार यांनी आरोपींशी संपर्क साधल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर अशोक कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चौकशीत महत्त्वाचे दावे

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी नरेश याने, अशोक कुमार आणि सेंथिल बालाजी यांच्या सांगण्यावरून आपण टीव्हीकेच्या आमदाराशी संपर्क साधला, असा जबाब दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. या जबाबांच्या आधारे तपासाचा विस्तार करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

यापूर्वीही पाच जणांना अटक

याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी चेन्नई पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली होती. त्यांच्यावरही टीव्हीकेच्या एका आमदाराला पक्षांतरासाठी प्रवृत्त करून सरकार अस्थिर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपपत्र किंवा न्यायालयीन प्रक्रियेत आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोप तपासाच्या अधीन आहेत.

Web Title: Tamilnadu alleged horse trading case thalapathy vijay government three arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • aidmk
  • Tamilnadu
  • Thalapathy Vijay
  • TVK

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.