मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५ पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पर्यटकांच्या एका गटावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी लष्कराचे पथक दाखल झाले आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
#WATCH | Firing incident reported in Pahalgam, J&K; Police and Security Forces present on the spot
Details awaited. pic.twitter.com/jlDZ1oubnB
— ANI (@ANI) April 22, 2025
भारतीय लष्कराचे पथक पहलगांम परिसरात पोहोचले असून, या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या पर्यटकांवर हल्ला जल आहे ते पर्यटक राजस्थानचे असल्याचे समजते आहे. पाकिस्तानचे लष्कर पप्रमुखांनी हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त भाषण केले होते. त्यानंतर लगेचच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
पाकिस्तानी सैन्याचा आपल्याच नागरिकांवर ड्रोन हल्ला
पाकिस्तानी सैन्याने आपल्याच देशातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यांमध्ये नऊ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याने मात्र हा दहशतवाद्यांवर केलेला हल्ला असून, यात 12 दहशतवादी देखील ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(29 मार्च) सकाळी दहशतवाद विरोधी अभियाना अंतर्गत हे हल्ले करण्यात आले. मरदान जिल्ह्यातील कटलांग या भागातील डोंगराळ भागात लपलेल्या दहशतवाद्यांना यात लक्ष्य करण्यात आले होते.
पाकिस्तानी सैन्याचा आपल्याच नागरिकांवर ड्रोन हल्ला; 12 दहशतवादी ठार केल्याचा दावा
दहशतवादी निवासी भागात लपल्यामुळे हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांचा देखील बळी गेल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. मृत नागरिकांमध्ये सात पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात आले आहेत. रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते मोहम्मद अब्बास यांनी सांगितले, की मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह अगदी छिन्न-विछिन्न अवस्थेत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नागरिक हे स्वात जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नव्हता.
हल्ल्यानंतर स्थानिकांनी नागरिकांच्या मृतदेहांना हायवेवर ठेऊन पाकिस्तीनी सैन्याचा विरोध करण्यास सुरूवात केली होती. मात्र, काही काळानंतर सैन्याने त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत मृतदेह कॉम्प्लेक्समध्ये नेण्यास परवानगी दिली. रेस्क्यू सर्व्हिस 1122 हे मृतदेहांचे डीएनए परिक्षण करत आहेत. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये 12 कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यातील मोहसीन बाकिर या दहशतवाद्यावर 7 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस देखील होते. सशस्त्र दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार, हे अभियान राबवण्यात आले होते.