Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Rest of India defeated Kashmir in irani cup 2026: इराणी कप २०२६ चा अंतिम सामना रेस्ट ऑफ इंडिया आणि जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघांमध्ये खेळला गेला. रेस्ट ऑफ इंडियाने हा सामना १६७ धावांनी जिंकला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 06:13 PM
Rest of India defeated Kashmir in irani cup 2026

Rest of India defeated Kashmir in irani cup 2026

Follow Us
Follow Us:
  • रेस्ट ऑफ इंडियाने उडवला काश्मीर टीमचा धुव्वा
  • स्मरण-मुकेशच्या कमालीनं रेस्ट ऑफ इंडियाचा विजय
  • जम्मू-काश्मीरची दाणादाण

ईराणी कप २०२६ (Irani Cup 2026) च्या सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया क्रिकेट संघाचा सामना जम्मू आणि काश्मीर संघाशी झाला. या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या डावात ६८ षटकांत २३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. त्यानंतर, ऋषभ पंतच्या संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत ३१९ धावा केल्या. तर, जम्मू आणि काश्मीरचा संघ दुसऱ्या डावात १११ धावांवर गारद झाला. रेस्ट ऑफ इंडियाने हा सामना १६७ धावांनी जिंकला.

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडियाने केले कमबॅक

पहिल्या डावात, रेस्ट ऑफ इंडियाच्या (Rest of India) संपूर्ण संघाने २३७ धावा केल्या. सलामीवीर शिखर मोहनने ६० धावा केल्या. स्मरण रविचंद्रननेही ६८ धावा केल्या. सरफराज खाननेही महत्त्वपूर्ण ४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, जम्मू आणि काश्मीरने २७८ धावा केल्या. कर्णधार पारस डोग्राने सर्वाधिक ७५ धावा केल्या. अब्दुल समदनेही ५७ धावा करून त्याला उत्तम साथ दिली.याशिवाय, गोलंदाज नासिर मुजफ्फरनेही ६४ धावा केल्या.

दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडियाने ३१९ धावा केल्या. सलामीवीर सनत संगवानने ५५ धावा केल्या. स्मरण रविचंद्रननेही १५३ चेंडूंमध्ये १३५ धावांची खेळी करून पंतच्या संघाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली. चौथ्या डावात २०० धावांचा टप्पा ओलांडणे सोपे नव्हते. परंतु स्मरण रविचंद्रनने शानदार शतक ठोकून एकहाती सामन्याचे चित्र पालटले आणि जम्मू आणि काश्मीर संघावर दबाव आणला.

जम्मू आणि काश्मीर संघाचा दारुण पराभव

दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरने चांगली सुरुवात केली. ५४ धावांवर त्यांची पहिली विकेट पडली. मात्र, दोन सलामीवीर वगळता कोणीही जास्त वेळ मैदानावर टिकू शकले नाही, परिणामी संघ २८.४ षटकांत केवळ १११ धावांवर सर्वबाद झाला. कामरान इक्बालने ३२, तर शुभम खजुरियाने ३६ धावा केल्या. अब्दुल समदनेही २० धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही.

गोलंदाजीमध्ये, मुकेश कुमारने ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघासाठी सहा महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. त्याने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतले, तर मुकेश चौधरीनेही एक विकेट घेतला. मुकेशने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतले. स्टार वेगवान गोलंदाज आकाशदीपने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऋषभ पंतच्या संघाला हा सामना सहज जिंकण्यास मदत केली.

India vs Brazil: पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर भारताची कोंडी! ब्राझीलने टीम इंडियाचा 4-0 ने केला गेम ओव्हर

Web Title: Irani cup 2026 rest of india vs jammu kashmir smaran mukesh best performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • BCCI India
  • cricket news
  • jammu kashmir
  • Mukesh Kumar
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण
1

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King
2

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…
3

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
4

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.