Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. त्यातच देशातील जवळजवळ प्रत्येक दुसरे शहर गंभीर वायू प्रदूषणाने ग्रस्त आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2026 | 07:31 AM
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता फक्त 'या' वाहनांनाच एंट्री

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता फक्त 'या' वाहनांनाच एंट्री

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. त्यातच देशातील जवळजवळ प्रत्येक दुसरे शहर गंभीर वायू प्रदूषणाने ग्रस्त आहे. हे अल्पकालीन नव्हे तर दीर्घकालीन कारणांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. सतत उत्सर्जन करणारे स्रोत प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. टॉप १० प्रदूषित शहरांपैकी सात दिल्ली-NCR मध्ये आहेत. हा चिंताजनक निष्कर्ष सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या विश्लेषणातून आला आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रदूषित शहरांपैकी फक्त ४% शहरे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत येतात. CREA ने उपग्रह डेटा वापरून ४,०४१ शहरांमध्ये PM२.५ पातळीचे मूल्यांकन केले. यापैकी किमान १,७८७ शहरांमध्ये पाच वर्षांत (२०१९-२०२४) दरवर्षी राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त PM२.५ पातळी होती. मूल्यांकनात २०२० चा समावेश नव्हता कारण त्यावेळी कोविड-१९ साथीचा आजार पसरला होता. पीएम २.५ म्हणजे हवेतील सूक्ष्म कण ज्यांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी होता. हे कण इतके लहान आहेत की ते श्वासाने घेतले जाऊ शकतात आणि फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढतात.

हेदेखील वाचा : राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली

दरम्यान, अहवालात असे म्हटले आहे की, प्रदूषणाची तीव्रता असूनही, हवा स्वच्छ करण्यासाठी सुरू केलेल्या एनसीएपीमध्ये फक्त १३० शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १७८७ सर्वात प्रदूषित शहरांपैकी फक्त ६७ शहरांचा समावेश आहे. एनसीएपी केवळ ४ टक्के दीर्घकालीन प्रदूषित शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा सामना करण्यास सक्षम आहे.

बिरनिहाट, दिल्ली आणि गाझियाबाद ही सर्वात प्रदूषित शहरे

मूल्यांकन अहवालानुसार, २०२५ च्या पीएम २.५ प्रक्षेपणात आसाममधील बिरनिहाट, दिल्ली आणि गाझियाबाद हे तीन प्रमुख प्रदूषित शहरे होती. बिरनिहाटमध्ये प्रति घनमीटर १०० मायक्रोग्राम, दिल्लीमध्ये ९६ मायक्रोग्राम/घनमीटर आणि गाझियाबादमध्ये ९३ मायक्रोग्राम/घनमीटर वायूचे प्रमाण होते.

हेदेखील वाचा : Delhi Air Pollution : दिल्लीत श्वास घेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण; खतरनाक बॅक्टेरियावर औषधांचाही होत नाही परिणाम

Web Title: The air pollution situation is serious in many cities across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Delhi Air Pollution
  • Delhi news

संबंधित बातम्या

‘आता काय, आम्ही कुत्र्यांचे…’; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य
1

‘आता काय, आम्ही कुत्र्यांचे…’; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार
2

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली
4

राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.