the changing face of comedy kunal kamras parody creates a stir in politics
नवी दिल्ली : तानाजी म्हणाला, नेताजी पूर्वी मेहमूद, ओमप्रकाश, जॉनी वॉकर, राजेंद्रनाथ, मुकरी, केष्टो मुखर्जीसारखे हास्यकलावंत पिक्चर मध्ये काम करून प्रेक्षकांना मनमुराद हसवायचे. त्यांचे निव्वळ चेहरे व हावभाव बघितले तरी हसू यायचे. कॉमेडियन शिवाय चित्रपट हि नीरसता आहे. कॉमेडी म्हणजे कुठल्याही सिनेमाचा आत्मा असतो. कुणी नाचत -गात तर कुणी बसल्या बसल्या गंभीर चेहऱ्याने कॉमेडी करत प्रेक्षकांना हसवितात. आज कुणावर कॉमेडी करणे जीवावर बेतने ठरत आहे. राजू श्रीवास्तव, सुनील पाल यांची कॉमेडी कधी व्यक्ती केंद्रित असायची. तरी पण त्यावर कुठे काही रोष दिसला असे आठवत नाही. राजू श्रीवास्तव आज हयात नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ‘हा’ मुलगा? ज्याने 3 आठवडे आधीच केली होती म्यानमारच्या भूकंपाची भविष्यवाणी
नेताजी म्हणाले आता सहनशीलता ताटात मिठासारखी उरली आहे. तानाजी, कॉमेडी व्यक्ती पातळीवर उतरत असेल तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न होणारच. कॉमेडी व पॅरोडी समजली पाहिजे. ठाणे का रिक्शा, दाढी और चष्मा शब्दांचा वापर करून स्टँडअप कॉमेडियन कामरा पुरते अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला या शब्दांनी ढवळून काढले आहे. तानाजी म्हणाला, कामरा याने आपले कर्म केले आहे. आता त्याच्या पॅरोडीने कर्माचे फळ भोगायला तयार असले पाहिजे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारमध्ये 200 वर्षांतील सर्वात तीव्र भूकंप; 694 मृत्यूंची पुष्टी, हजारो जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गीतेत कृष्ण म्हणाले कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थ असा कि तुमचा अधिकार कर्म करण्याचा पण फळाचा नाही. कामरांनी फळाची आशा ठेवता कामा नये. काही जण म्हणतात माणसाला कर्माची फळे येथेच भोगावी लागतात. . हिंदी सिनेमात एक गाणे आहे. सून चंपा, सून तारा त्याला जोड द्यावी लागेल. अडचणीत सापडला रे कामरा. तू सागर, तू हि किनारा. उद्धव के सूर से सूर मिलाया तुने कामरा… कामरा आता राहुल गांधींकडे गेले तर ते म्हणतील डरो मत कामरा… शिंदेंचे बंदे म्हणतात, कामरा तुझे वाजवू कि बारा… कामरा पॅरोडी लिहिताना कुणी व्यक्तिपातळीवर दुखावणार नाही याची काळजी घ्यावी हा आमचा सल्ला आहे. राजकारणी आज भांडतात ते उद्या गळ्यात गळा घालतांना दिसतील. ते एकमेकांना आज गधे घोडे म्हणतील उद्या वाघ – सिंह म्हणू शकतात. रचना करताना आपण उताना पडू नये याची काळजी घेत चला कामरा.