असा दावा केला जात आहे की अभिज्ञा आनंद यांनी या भूकंपाचा अंदाज 3 आठवडे आधीच वर्तवला होता. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
म्यानमार : 7.7 रिश्टर स्केलच्या प्रचंड भूकंपामुळे म्यानमार आणि थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या विनाशानंतर एक अनोखी चर्चा रंगू लागली आहे – एका लहान वयाच्या तरुण ज्योतिषीने तीन आठवडे आधीच या भूकंपाचा इशारा दिला होता!
१ मार्च रोजी अभिज्ञा आनंद यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये हा दावा करण्यात आला होता की, ‘येत्या काही आठवड्यांत किंवा वर्षाच्या मध्यभागी मोठा भूकंप होऊ शकतो’. या अंदाजानंतर प्रत्यक्षात भूकंप झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्योतिषशास्त्राच्या आधारे घडलेल्या या भविष्यवाणीने अनेक जण अचंबित झाले आहेत.
या भूकंपाने थायलंड आणि म्यानमारमध्ये मोठे नुकसान केले. थायलंडच्या बँकॉक शहरात निर्माणाधीन इमारत कोसळल्याने किमान तीन जणांचा मृत्यू झाला, तर ९० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. म्यानमारमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून, बचावकार्य वेगाने सुरू आहे. थायलंडचे संरक्षण मंत्री फुमथम वेचायचाई यांनी या आपत्तीची पुष्टी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारमध्ये 200 वर्षांतील सर्वात तीव्र भूकंप; 694 मृत्यूंची पुष्टी, हजारो जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे राहणारे अभिज्ञा आनंद हे अवघ्या २० वर्षांचे असून, ११ वर्षांपासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. ते सर्वात तरुण ज्योतिषींपैकी एक मानले जातात. विशेष म्हणजे, वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संपूर्ण भगवद्गीता पाठ केली होती. संस्कृत भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास असून, त्यांच्या आईने त्यांना वेद आणि ज्योतिषशास्त्र शिकण्याची प्रेरणा दिली. आज अभिज्ञा यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल आहे, जिथे ते ज्योतिषावर आधारित भाकिते करतात आणि त्यांचे शेकडो व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत.
१ मार्च रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये अभिज्ञा यांनी तीन आठवड्यांत मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे, त्यांनी भूकंप होणाऱ्या ठिकाणांचा नकाशाद्वारे उल्लेख केला होता, आणि ती माहिती खरी ठरली! एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञा म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने त्यांना या मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन केले आहे. संस्कृत आणि ज्योतिषशास्त्रात निपुण असलेल्या अभिज्ञा यांनी फक्त १२ वर्षांच्या वयात वास्तुशास्त्रातील पदवी पूर्ण केली आहे.
अभिज्ञा आनंद यांनी यापूर्वीही अनेक भविष्यवाण्या केल्या असून, त्यातील अनेक अचूक ठरल्या आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील माहितीनुसार, त्यांनी खालील घटनांची पूर्वसूचना दिली होती:
या सर्व घडामोडींनी जगभरातील ज्योतिष अभ्यासक आणि वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिज्ञा यांनी २०१८ मध्ये ‘प्रज्ञा ज्योतिष’ ही संस्था स्थापन केली, जिथे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणि १५० संशोधकांना ते ज्योतिषशास्त्र शिकवत आहेत. त्यांचा उद्देश वैदिक ज्ञानाचा प्रसार करणे आणि ज्योतिषशास्त्राद्वारे समाजाला दिशा देणे हा आहे. त्यांच्या यशामागे केवळ भविष्यवाणी नसून, ज्योतिषशास्त्र, ग्रहांची स्थिती, वेदांचे ज्ञान आणि गणिताच्या माध्यमातून सिद्धांत मांडण्याची प्रतिभा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमार आणि बँकॉकमध्ये भूकंपामुळे अत्यंत भयावह स्थिती; पाहा ‘हे’ अंगावर शहारे आणणारे VIDEO
म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपानंतर अभिज्ञा आनंद यांचे भाकीत चर्चेचा विषय बनले आहे. जगभरातील लोक यावर संशोधन आणि चर्चा करत आहेत. त्यांचा अभ्यास आणि अचूक अंदाज पाहता, त्यांच्या भविष्यवाण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पुढील काही महिन्यांत ते कोणते भाकीत करतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.