Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचं ‘हे’ क्षेपणास्त्र २४४८ किलोमीटर प्रति तास वेगानं शत्रूवर करणार हल्ला, १०० किलोमीटरच्या रेंजमध्ये येणाऱ्या शत्रूच्या वाहन, विमान, ड्रोन किंवा क्षेपणास्त्राला करू शकतं नष्ट

भारताने इस्रायलकडून MRSAM क्षेपणास्त्रांच्या पाच रेजिमेंट खरेदी करण्याबाबत बोलले आहे. यात ४० लाँचर्स आणि २०० क्षेपणास्त्रे असतील. या डीलची किंमत सुमारे १७ हजार कोटी रुपये आहे. या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे भारताला हवाई संरक्षण ढाल बनण्यास मदत होईल. ते २०२३ पर्यंत तैनात केले जातील अशी अपेक्षा आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 27, 2022 | 03:57 PM
भारताचं ‘हे’ क्षेपणास्त्र २४४८ किलोमीटर प्रति तास वेगानं शत्रूवर करणार हल्ला, १०० किलोमीटरच्या रेंजमध्ये येणाऱ्या शत्रूच्या वाहन, विमान, ड्रोन किंवा क्षेपणास्त्राला करू शकतं नष्ट
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सैन्यासाठी बनवलेल्या मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्र (MRSAM) ची आज ओडिशा येथील बालासोर एकात्मिक चाचणी श्रेणीतून यशस्वी चाचणी करण्यात आली. क्षेपणास्त्राने काही मिनिटांतच पूर्ण अचूकतेनं लक्ष्य पुर्ण केलं.

हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) इस्रायलच्या IAI कंपनीच्या सहकार्याने बनवले आहे. भारताला इस्रायलकडूम मिळालेलं बराक क्षेपणास्त्रही MRSAM आहे. सरफेस टू एअर मिसाइल (SAM) आर्मी वेपन सिस्टीममध्ये कमांड पोस्ट, मल्टी-फंक्शन रडार, मोबाईल लाँचर सिस्टीम असते. हे इस्रायलच्या बराक-८ या धोकादायक क्षेपणास्त्रावर आधारित आहे.

MRSAM (मध्यम रेंज सरफेस टू एअर मिसाइल) चे वजन सुमारे २७५ किलो आहे. लांबी ४.५ मीटर आणि व्यास ०.४५ मीटर आहे. या क्षेपणास्त्रावर ६० किलोचे वॉरहेड म्हणजेच शस्त्र लोड केले जाऊ शकते. हे दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे, जे प्रक्षेपणानंतर कमी धूर सोडते. एकदा लाँच केल्यावर, MRSAM (मध्यम रेंज सरफेस टू एअर मिसाइल) थेट आकाशात १६ किमी पर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. तसेच, त्याची श्रेणी अर्धा किलोमीटर ते १०० किलोमीटर आहे. म्हणजेच या रेंजमध्ये येणारे शत्रूचे वाहन, विमान, ड्रोन किंवा क्षेपणास्त्र नष्ट केले जाऊ शकते.

[read_also content=”दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बंगाल: २४ तासांत ९ जिल्ह्यांतून ३५० हून अधिक बॉम्ब सापडले, बीरभूम हिंसाचारानंतर पोलीस टाकत आहेत छापे https://www.navarashtra.com/india/bengal-on-gunpowder-pile-more-than-350-bombs-were-found-from-9-districts-in-24-hours-police-are-raiding-after-birbhum-violence-260474.html”]

MRSAM (मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल) क्षेपणास्त्रातील नवीन गोष्ट म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, म्हणजेच शत्रूचं यान जर चकमा देण्यासाठी वापरत असेल तर ते त्याला पाडू शकेल. त्याचा वेग ६८० मीटर प्रति सेकंद म्हणजेच २४४८ किलोमीटर प्रति तास आहे. त्याचा वेगही त्याला अत्यंत घातक बनवतो. भारताने इस्रायलकडून MRSAM क्षेपणास्त्रांच्या पाच रेजिमेंट खरेदी करण्याबाबत बोलणं झालेलं आहे. यात ४० लाँचर्स आणि २०० क्षेपणास्त्रे असतील. या डीलची किंमत सुमारे १७ हजार कोटी रुपये आहे. या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे भारताला हवाई संरक्षण ढाल बनण्यास मदत होईल. ते २०२३ पर्यंत तैनात केले जातील अशी अपेक्षा आहे.

[read_also content=”अमरावतीत ट्रक व तवेराचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/truck-and-tavera-accident-in-amravati-four-people-died-nrps-260426.html”]

Web Title: This indian missile attacks the enemy at a speed of 2448 km h the test is successful nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2022 | 03:55 PM

Topics:  

  • india
  • India's New Missile

संबंधित बातम्या

जनगणना २०२६ चे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात; मोबाईल ॲपमुळे घरबसल्या करता येणार माहितीची नोंद
1

जनगणना २०२६ चे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात; मोबाईल ॲपमुळे घरबसल्या करता येणार माहितीची नोंद

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
2

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

Silver Import India: चांदी आयातीवर जीटीआरआयचा इशारा; म्हणाले की, चीनच्या वर्चस्वातून.. 
3

Silver Import India: चांदी आयातीवर जीटीआरआयचा इशारा; म्हणाले की, चीनच्या वर्चस्वातून.. 

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका
4

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.