Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyank Kharge: प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील ‘त्या’ वक्तव्यप्रकरणी कोर्टाचे समन्स; २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर

बंगळुरूच्या न्यायालयाने २७ जून रोजी हे समन्स जारी केले असून, २१ जुलैपर्यंत यावर उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात प्रियांक यांनी केलेल्या टिप्पणीबाबत फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती; या तक्रारीवरील सुनावणीनंतर न्यायालयाने हे समन्स जारी केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 05:21 PM
प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील 'त्या' टिप्पणीप्रकरणी कोर्टाचे समन्स (Photo Credit- X)

प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील 'त्या' टिप्पणीप्रकरणी कोर्टाचे समन्स (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ!
  • RSS विरोधातील ‘त्या’ कमेंटप्रकरणी कोर्टाचे समन्स
  • २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर
आरएसएस (RSS) विरोधात केलेल्या विधानांमुळे कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे आणि युवा काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपाड यांना समन्स बजावण्यात आले आहे. बंगळुरूच्या न्यायालयाने २७ जून रोजी हे समन्स जारी केले असून, २१ जुलैपर्यंत यावर उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात प्रियांक यांनी केलेल्या टिप्पणीबाबत फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती; या तक्रारीवरील सुनावणीनंतर न्यायालयाने हे समन्स जारी केले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संदीप पाटील यांनी निरीक्षण नोंदवले की, प्रियांक खर्गे आणि नलपाड यांच्या विरोधात ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम ३५६ अन्वये फौजदारी मानहानीचा गुन्हा सिद्ध होण्याजोगी प्राथमिक बाब दिसून येते.

न्यायालयाने काय म्हटले?

आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, “आरोपी क्रमांक १ प्रियांक खर्गे आणि आरोपी क्रमांक ३ मोहम्मद नलपाड यांच्या विरोधात BNS, २०२३ च्या कलम ३५६ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्याची दखल घेण्यात आली आहे. कार्यालयाला निर्देश देण्यात येत आहेत की, याची फौजदारी खटला म्हणून नोंद करावी आणि आरोपी क्रमांक १ व ३ यांना समन्स बजावून २१ जुलै २०२६ पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगावे.” तथापि, कर्नाटकचे माजी मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या विरोधात कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिला.

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला

ऑक्टोबर २०२५ मधील विधानावरून गुन्हा दाखल

ही याचिका बंगळुरूचे रहिवासी आणि आरएसएसचे कार्यकर्ते ए. तेजस यांनी दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, आरोपींनी ऑक्टोबर २०२५ मध्ये आरएसएस आणि त्यांच्या सदस्यांना लक्ष्य करून अनेक मानहानीकारक विधाने केली होती. तक्रारीनुसार, मंत्री असताना प्रियांक खर्गे यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्नाटक सरकारला पत्र लिहून आरएसएसला सरकारी क्रीडांगणे, शाळा आणि महाविद्यालये वापरण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. तक्रारदाराचा आरोप आहे की, संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे पत्र जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांना दिले गेले आणि खर्गे यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले गेले.

तक्रारीत सोशल मीडिया पोस्ट्सचा उल्लेख

तक्रारीत खर्गे यांनी गेल्या वर्षी १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी केलेल्या कथित सोशल मीडिया पोस्ट्सचाही उल्लेख आहे. एका पोस्टमध्ये म्हटले होते, “आरएसएस सदस्याशी कधीही मैत्री करू नका केवळ मित्रच नाही, तर ते कुटुंबातील सदस्य असले तरीही. ते मुळातच अपमानास्पद किंवा शिवराळ वृत्तीचे लोक असतात.” न्यायालयाने मंत्री प्रियांक खर्गे आणि युवक काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपाड यांच्याकडून २१ जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. मात्र, न्यायालयीन कामकाजाबाबत विचारले असता, मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाष्य करण्यास नकार दिला.

मृत मुलाच्या फोनमध्ये आईवडील आजही करतात रिचार्ज! ‘गेला पण आयुष्यभराचं ओझं देऊन गेला’ शेख कुटुंबीयांची हळवी कहाणी

Web Title: Trouble mounts for priyank kharge court summons issued over that comment against the rss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Bengaluru
  • Congress leader
  • RSS

संबंधित बातम्या

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड
1

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.