Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथकेही घटनास्थळी पोहोचली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 16, 2025 | 07:28 AM
श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

बडगाम : मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा एका भरधाव डंपर आणि सुमो (प्रवासी वाहन) यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. वाटरवानी-बडगाम रिंग रोडवर हा अपघात झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथकेही घटनास्थळी पोहोचली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून, मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आता या मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेदेखील वाचा : ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या माहितीनुसार, १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, “बडगाममधील रस्ते अपघाताची माहिती मिळताच अत्यंत दुःख झाले. दुखित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यातील जखमी उपचार होऊन ते लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना करतो.”

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही बडगाममधील अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यांनी प्रशासनाला सर्व शक्य मदत देण्याचे आणि जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी सुरू आहे.

श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यातच स्फोट

श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्यात मोठा स्फोट झाला. हा स्फोट शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झाल्याची माहिती दिली जात आहे. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. डझनभराहून अधिक वाहनांना आग लागली. या स्फोटामुळे जवळच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा स्फोट इतका मोठा की, आसपासच्या परिसरात याचा आवाज आला.

Web Title: Two vehicles collide in budgam srinagar four people killed on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 07:23 AM

Topics:  

  • Accident News
  • Srinagar

संबंधित बातम्या

श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यातच मोठा स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी
1

श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यातच मोठा स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.