ugc net exam
यूजीसी नेटचा जून महिन्यातील परीक्षेचानिकाल आज जाहीर झाला आहे. देशभरातील 181 शहरांमध्ये 83 विषयांसाठी घेण्यात आली होती. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा 13 ते 17 जून आणि दुसरा टप्पा 19 ते 22 जून 2023 असा होता. यावेळी एकूण 6,39,069 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
UGC NET निकाल 2023 कसा डाउनलोड करायचा?
पायरी 1: ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
पायरी 2: मुख्यपृष्ठावर, UGC NET जून 2023 निकालासाठी उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: एक नवीन विंडो उघडेल, तुमचा लॉगिन तपशील भरा जसे की अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख.
पायरी 4: तुमचे UGC NET जून 2023 स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
पायरी 5: ते डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट घ्या.
कोणत्याही उमेदवाराला स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यात अडचण आल्यास, तो ugcnet@nta.ac.in वर मेल करू शकतो अधिक अपडेट्स किंवा ताज्या बातम्यांसाठी NTA च्या अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.nic.in ला भेट देऊ शकतो.
NTA द्वारे पात्र उमेदवारांना ई-प्रमाणपत्रे आणि JRF पुरस्कार पत्र लवकरच जारी केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त माहिती आणि तपशिलासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.