नवी दिल्ली – भारतातील शेतकऱ्यांसाठी इंडोनेशियाच्या बंदरातून ७८ हजार मेट्रिक टन युरिया घेऊन दोन जहाजे निघाली, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाच्या किमती वाढल्याने या दोन्ही जहाजांवर भरलेला युरिया चीनमध्ये विकण्यात आला. या फेरफारामुळे भारतीय शेतकऱ्यांना जो युरिया एप्रिलमध्ये मिळणे अपेक्षित होते तो जूनमध्ये मिळू शकला. यासाठी अंबर फर्टिलायझर या पुरवठादार कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की २० मार्च रोजी इंडोनेशियन बंदरातून ७८ हजार मेट्रिक टन युरिया घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना झाली. एक जहाज गुजरातमधील मंुद्रा आणि दुसरे विशाखापट्टणममधील काकीनाडा बंदरात पोहोचणार होते.
या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाची किंमत तीनपटीने वाढली होती. यामुळे पुरवठादार कंपनीने अन्य कंपनीशी करार करून युरियाची जहाजे भारताऐवजी चीनच्या बंदरात पोचवली आणि तिथून दुसऱ्याला विकली गेली. मात्र, शासनाचे नुकसान झाले नाही. मात्र, आयपीएलला पुन्हा निविदा कराव्या लागल्या.