
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात KTM च्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. कंपनीच्या बाईक उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. मात्र, आता कंपनीने त्यांच्या बाईक्सच्या किमतीत वाढ केली आहे.
KTM 390 Adventure ची किंमत आता 27,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. GST च्या नव्या बदलांनंतर बजाजने घोषणा केली होती की केटीएम आणि ट्रायम्फच्या 350 cc मॉडेल्सच्या किमती वाढवल्या जातील. मात्र सध्या किंमत वाढ फक्त KTM 390 Adventure आणि KTM 390 Adventure X या दोन मॉडेल्सपुरतीच मर्यादित आहे.
Mahindra, Tata आणि Maruti च्या Electric Car लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
GST 2.0 लागू झाल्यानंतर 350 cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सवरचा कर 31% वरून 40% इतका वाढला. या वाढीनुसार किंमत तेव्हाच वाढायला हवी होती, पण कंपनीने तत्काळ दरवाढ केली नाही. त्यामुळे मागील महिन्यात या बाईक्सची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती. आता मात्र KTM 390 Adventure आणि 390 Adventure X यांच्या किमतीत अधिकृत वाढ करण्यात आली आहे.
KTM 390 Adventure X च्या बेस मॉडेलची किंमत आधी 3.04 लाख रुपये होती, जी आता 3.26 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच किंमतीत 22,410 रुपयांची वाढ झाली आहे.
KTM 390 Adventure ची आधीची किंमत 3.68 लाख रुपये होती, ती वाढून आता 3.95 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच एकूण 27,000 रुपयांची वाढ नोंदली गेली आहे. केटीएमच्या इतर 390 मॉडेल्सच्या किमती वाढणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज
KTM 390 Adventure X मध्ये single-cylinder, 4-valve, DOHC, FI इंजिन दिले आहे, जे 8,500 rpm वर 46 PS पावर आणि 6,500 rpm वर 39 Nm टॉर्क तयार करते. या बाइकचा व्हीलबेस 1470 mm आहे.
KTM 390 ॲडव्हेंचरमध्ये 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन दिले आहे, जे 8,500 rpm वर 46 PS ची शक्ती आणि 6,500 rpm वर 39 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये 1470 mm इतका व्हीलबेसही देण्यात आला आहे. दोन्ही बाइक्समध्ये आधुनिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही बाईक्समध्ये आधुनिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.