Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Cloudburst: निसर्गाचा महाप्रकोप! उत्तरकाशीत ढगफुटी; बघता बघता 6 पेक्षा जास्त…

उत्तराखंड राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उत्तरकाशी येथे दुसऱ्यांदा ढगफूटी झाली आहे. नौगांव येथे मोठे नुकसान झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 06, 2025 | 09:17 PM
Uttarakhand Cloudburst: निसर्गाचा महाप्रकोप! उत्तरकाशीत ढगफुटी; बघता बघता 6 पेक्षा जास्त…
Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढला 
उत्तरकाशीत ढगफुटी 
देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती

Uttarkashi Cloudburst: उत्तराखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे ढगफुटी झाली आहे. उत्तरकाशी येथील नौगांव येथे ढगफूटी झाली आहे. ढगफुटी झाल्याने या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. वाहून आलेल्या ढीगाऱ्यात एक निवासी इमारत गाडली गेली आहे. त्यामुळे या ढीगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे.

सहा पेक्षा जास्त इमारती पाण्यात बुडाल्या आहेत. देवलसारी परिसरात एक मिक्सर मशीन आणि काही दुचाकी देखील वाहून गेल्याचे समजते आहे. एक चार चाकी देखील बुडाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. याआधी नौगांव येथील नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याची सूचना देण्यात आली होती.

उत्तरकाशी जिले के नौगांव क्षेत्र के देवलसारी इलाके में बादल फटने की सूचना है।#UttarkashiCloudBurst#Naugaon#Uttarakhand pic.twitter.com/FgY4w0njAk — Uttarakhand DIPR (@DIPR_UK) September 6, 2025

नदी दुथडी भरून वाहत असल्याने अनेक घरे आणि दुकानात पाणी शिरले होते. दरम्यान उत्तराखंडच्या काही जिल्ह्यात भुस्खलन होण्याची शक्यता आहे. रुद्रप्रयाग जिल्हा हा संवेदनशील समजला जात आहे. उत्तराखंडमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. तर येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आजपासून 9 तारखेपर्यंत उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. पुरस्थिती पंजाबमध्ये अजूनही कायम आहे.

एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिस, लष्कर आणि अन्य आपत्कालीन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. नाल्याच्या पूरामुळे परिसरात आणखी नुकसान झाले असून, सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेले लष्कराचे जवान मदतकार्य करत आहेत.सध्या पूर्ण परिसरात मदतकार्यात अडथळे येत असून हवामानही साथ देत नाही. मात्र सर्व यंत्रणा याठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.  परिसरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पावसाचा मोर्चा ‘या’ राज्यांकडे वळला

आज देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यात आणि दक्षिण भारतात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवमान विभागाने बिहार, झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

IMD Rain Alert: आज सगळीकडे दाणादाण! पावसाचा मोर्चा ‘या’ राज्यांकडे वळला; अलर्ट वाचून म्हणाल…

गुजरात राज्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. सरदार सरोवर धरणातून साडेचार लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title: Uttarkashi cloudburst in uttarakhand heavy rain flood nougaon latest breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 08:58 PM

Topics:  

  • Cloud Burst
  • Uttarakashi
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
1

Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.