हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. किन्नोरमध्ये ढगफुटी झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास थांच गावात तीन नद्यांची पातळी वाढली. त्यामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.
उत्तराखंड राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उत्तरकाशी येथे दुसऱ्यांदा ढगफूटी झाली आहे. नौगांव येथे मोठे नुकसान झाले आहे.
चमोलीचे डीएम संदीप तिवारी म्हणाले की, थरलीमध्ये ढगफुटीमुळे बरेच नुकसान होण्याची शक्यता आहे. बराच ढिगारा आला आहे, ज्यामुळे एसडीएम निवासस्थानासह अनेक घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
किश्तवार आपत्तीत गंभीर जखमी झालेल्या २५ जणांवर जम्मू आणि काश्मीरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांचे प्राण वाचविण्यात आले
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील माचैल माता यात्रा मार्गावर ढगफुटीमुळे झाली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. लाकडी पूल आणि पीएमजीएसवाय पुलाचे नुकसान झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे.