Waqf Amendment Bill: वक्फ कायद्याविरोधात बंगालमध्ये हिंसक तणाव; आंदोलकांनी पोलिसांची वाहने पेटवली, विटा फेकल्या अन्...
कोलकाता: नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले.देशभरात अनेक ठिकाणी या विधेयकाचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी विधेयकाविरुद्ध आंदोलने केली जात आहे. बंगालमध्ये या कायद्यावरून आंदोलन पेटले आहे. पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे.
पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात उमरपूर-बानिपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांची वाहने पेटवली गेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील जाम केला गेला आहे. पोलिसांच्या वाहनाला यंग लावल्याने येथे सध्या तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
The West Bengal Police is struggling to rein in the violent Islamist mob rampaging through the streets of Murshidabad—possibly under instructions from Home Minister Mamata Banerjee herself. Her inflammatory speeches have directly contributed to the current unrest.
As a so-called… pic.twitter.com/vKKVabeMnl
— Amit Malviya (@amitmalviya) April 8, 2025
आंदोलकाना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. हा कायदा सरकारने मागे घ्यावा अशी मागणी या आंदोलकांची आहे. वक्फ कायद्याला देशात अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांवर आंदोलकांनी विटंाचा मारा केला. त्यानंतर रस्ता जाम केला. सध्या त्या परिसरात तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात?
वक्फ संशोधन विधेयकाल राष्ट्रपतींनी देखील मंजूरी दिली आहे. या विधेयकांचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे स्वागत तर काही ठिकाणी विरोध केला जात आहे. या विधेयकाविरुद्ध जवळपास 15 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या बिलाविरुद्ध अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान पुढील आठवड्यात यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सर्व याचिकानवर एकत्रित सुनावणी होण्याचा अंदाज आहे. हे विधेयक अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचे आरोप या सर्व याचिकेतून करण्यात आले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला सत्ताधारी पक्षाने ऐतिहासिक विधेयक म्हटले तर विरोधकांनी विरोध केला आणि हा संविधानावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी (दि.3) राज्यसभेत हे विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. हे विधेयक येथूनही मंजूर झाले. दुरुस्ती विधेयकातील व्याख्येनुसार, किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय. वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून ते जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना असतील. तसेच केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी बिगरमुस्लिम असावेत. बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल. केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्फची नोंदणी केली जाईल.