नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपला. अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर शनिवारी (दि.1) मतदान होत आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी कन्याकुमारी येथे पोहोचले आणि त्यांनी ऐतिहासिक भगवती अम्मन मंदिराला भेट दिली आणि पूजा केली.
निवडणुकीच्या घोषणेसोबतच 16 मार्चपासून देशात सुरू असलेली रणधुमाळी थंडावली असून, अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यात 3 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जागा आहेत. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसीची जागाही आहे. याशिवाय प. बंगालमधील डायमंड हार्बरची जागा, जेथून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी रिंगणात आहेत.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती लढत असलेली पाटलीपूत्रची जागाही याच टप्प्यात आहे. बिहारच्या ४, हिमाचल 4, झारखंड 3, ओडिशा 6, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, प. बंगाल १ जागांसह चंदिगड या केंद्रशासित प्रदेशात या टप्प्यात मतदान होत आहे.