Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Assembly Election 2026: ‘हा तर भाजपचा एजंट!’ हुमायूं कबीर यांच्या ताफ्यावर हल्ला, मुर्शिदाबादमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

रेजिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले हुमायूं कबीर विविध मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी त्यांना टीएमसी समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 23, 2026 | 02:54 PM
West Bengal Assembly Election 2026:

West Bengal Assembly Election 2026:

Follow Us
Close
Follow Us:
  • मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदानादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती
  • तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद
  • नौदा विधानसभा क्षेत्रात देशी बॉम्बफेक झाल्याची घटना
 

West Bengal Assembly Election 2026:  पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदानादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या दरम्यान हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच सुरक्षाकर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

नौदा येथे  दोन गटांमध्ये मोठी चकमक

मुर्शिदाबादमधील नौदा येथे टीएमसी ब्लॉक अध्यक्ष आणि हुमायूं कबीर यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. हुमायूं कबीर हे सध्या ‘आम जनता उन्नयन पार्टी’चे उमेदवार असून त्यांनी यापूर्वी टीएमसीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या विरोधात ‘चोर-चोर’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

West Bengal election 2026 : BJP विजयी मार्गावर? ममता दीदींनी सरळ राजकारण केलं असतं तर…राहुल

हुमायूं कबीर यांनी टीएमसीवर वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर टीएमसी समर्थकांनी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. परिस्थिती तणावपूर्ण झाली असली तरी सुरक्षाकर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठी झटापट टळली. दरम्यान, टीएमसी कार्यकर्त्यांनी हुमायूं कबीर यांना भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला आहे.

मतदान केंद्रांना भेटीदरम्यान विरोध

रेजिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले हुमायूं कबीर विविध मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी त्यांना टीएमसी समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

नौदा येथे देशी बॉम्बफेक; अनेक जखमी

नौदा विधानसभा क्षेत्रात देशी बॉम्बफेक झाल्याची घटना घडली असून काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे समर्थक रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. सुरक्षाकर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुरक्षेत वाढ

मुर्शिदाबाद हा संवेदनशील जिल्हा मानला जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अर्धसैनिक दलांची अतिरिक्त तुकडीही रवाना करण्यात आली आहे.

West Bengal Election 2026 : गजराज आले मतदानाला! झाडग्राममध्ये मतदान केंद्रात थेट महाकाय हत्तीची एन्ट्री

वादग्रस्त वक्तव्यानंतर निलंबन

टीएमसीने हुमायूं कबीर यांना डिसेंबर 2025 मध्ये पक्षातून निलंबित केले होते. त्यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद च्या धर्तीवर नवी मशीद उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. हा प्रस्ताव सांप्रदायिक सौहार्द बिघडवणारा आणि पक्ष शिस्तभंग करणारा असल्याचे सांगत टीएमसीने कारवाई केली. त्यानंतर हुमायूं कबीर यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला.

आसनसोलमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक

२०२६ च्या पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान, आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या वाहनावर कथितरित्या दगडफेक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रहमत नगर परिसरात घडली असून, त्यात वाहनाच्या काचा फुटल्या. अग्निमित्रा पॉल यांनी हिरापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

Web Title: West bengal assembly election 2026 bjp agent tmc workers jeer at humayun kabir amid voting tensions in murshidabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Murshidabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.