Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal ED Raid: पश्चिम बंगालमध्ये EDचा खेळ सुरू; कोळसा खाण घोटाळा प्रकरणी १२ ठिकाणी जलद छापेमारी

या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 03, 2026 | 12:35 PM
West Bengal ED Raid today

West Bengal ED Raid today

Follow Us
Close
Follow Us:
  • पश्चिम बंगाल राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूका
  • निवडणुकीच्या तोंडावर बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई
  •  पश्चिम बंगालचा कोळसा घोटाळ्याचे धागेदोरे झारखंडपर्यंत
West Bngal ED Raid: पश्चिम बंगाल राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्यात पश्चिम बंगालमधील जवळपास १२ हून अधिक ठिकामंवर अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. बेकायदेशीर कोळसा खाणकाम आणि मनी लाँड्रिंगच्या संदर्भात कोलकातासह राज्यात १२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत बेकायदेशीर व्यापार आणि काळ्या पैशाचे जाळे उध्वस्त झाले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर कोळसा खाणकाम आणि तस्करीवर आपली पकड आणखी घट्ट केली आहे. मंगळवारी (3 फेब्रुवारी) सकाळी, केंद्रीय एजन्सीच्या पथकांनी कोलकातासह राज्यात १२ ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते, तपास प्रामुख्याने बेकायदेशीरपणे उत्खनन केलेल्या कोळशाच्या चोरीत, त्याच्या वाहतुकीत आणि या प्रक्रियेद्वारे निर्माण झालेल्या काळ्या पैशाच्या लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या नेटवर्कवर केंद्रित आहे. एजन्सीला संशय आहे की या व्यवसायातून मिळणारे बेकायदेशीर उत्पन्न विविध शेल कंपन्या आणि मध्यस्थांद्वारे लाँड्रिंग केले गेले आहे.

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

झारखंड सिंडिकेटशी दुवे

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा शेजारच्या झारखंड राज्यात आहे. या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी या प्रकरणासंदर्भात झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले होते.

झारखंडमधील त्या कारवाईदरम्यान, केंद्रीय एजन्सीने कोळसा माफिया सिंडिकेट आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे संकेत आणि गुप्त कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांनी पश्चिम बंगालमधील अनेक प्रमुख व्यावसायिक आणि मध्यस्थांचा सहभाग दर्शविला आहे. या आधारे, आता हे आंतरराज्यीय नेटवर्क पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी बंगालमध्ये सखोल शोध मोहीम राबविली जात आहे.

ही चौकशी आय-पॅक आणि प्रतीक जैन प्रकरणापेक्षा वेगळी

या छाप्याबाबत एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देखील समोर आले आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी आय-पॅक संस्थेचे सहसंस्थापक आणि राजकीय सल्लागार प्रतीक जैन यांच्या कंपनी आणि घरावर छापेमारी केली होती. पण त्या छापेमारीचा आणि आजच्या कारवाई पूर्णपणे वेगळी असल्याचे म्हटले आहे.

Pankaja Munde helicopter : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच
आजची कारवाई ही बेकायदेशीर खाणकाम, त्याची वाहतूक आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित आहे. कोळसा माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या या मोहिमेने पुन्हा एकदा कोळसा चोरीचे प्रकरण खूप मोठे आणि संघटितपणे सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचवेळी या प्रकरणात खूप मोठे आणि प्रभावशाली व्यक्ती पडद्यामागे काम करत असल्याचेही आढळून आले आहे.

बेकायदेशीर कोळसा वाहतूक आणि काळ्या पैशाचे जाळे

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बेकायदेशीर कोळसा कसा वाहून नेला जात होता. कोळसा माफियांनी केवळ खाण क्षेत्रातून कोळश्याची चोरी केली नाही, तर या चोरीच्या कोळश्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करून मोठा नफाही मिळवला. आता, केंद्रीय एजन्सी या बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारांमध्ये असलेले सर्व धागेदोरे जोडण्याचा आणि या प्रकरणाचा तपास करत आहे.

आजच्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांवर आणि डिजिटल पुराव्यांवर आधारित, येत्या काळात अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. बंगालमधील १२ ठिकाणी सुरू असलेल्या या कारवाईने इतर कोळसा तस्करी माफिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांची झोप उडवली आहे. सध्या, अनेक एजन्सी पथके कागदपत्रांची छाननी करत आहेत आणि झारखंडमधून गोळा केलेल्या पुराव्यांशी त्यांची तुलना करत आहेत.

 

 

 

 

Web Title: West bengal ed raid the eds operation is underway in west bengal swift raids conducted at 12 locations in connection with the coal mining scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • ED Raids News
  • Mamta Banarjee
  • West bengal
  • west bengal election

संबंधित बातम्या

Travel News: भारतातील “मँगो सिटी” कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट…
1

Travel News: भारतातील “मँगो सिटी” कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट…

Suvendu Adhikari: एकेकाळी होते ममतांचे ‘उजवा हात’, मग सुवेंदू अधिकारींच्या हाती कसे आले ‘कमळ’? जाणून घ्या वादाचे खरे कारण
2

Suvendu Adhikari: एकेकाळी होते ममतांचे ‘उजवा हात’, मग सुवेंदू अधिकारींच्या हाती कसे आले ‘कमळ’? जाणून घ्या वादाचे खरे कारण

राजतिलक की करो तयारी! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’
3

राजतिलक की करो तयारी! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त
4

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.