Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Election: तर TMC खासदार टक्कल करणार..; डेरेक ओब्रायन यांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज

या राजकीय संघर्षात टीएमसीने आता निवडणूक आयोगाच्या विरोधातही आघाडी उघडली आहे. नवीन मतदार यादीतून सुमारे ९१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 08, 2026 | 10:50 AM
West Bengal Election:  तर TMC खासदार टक्कल करणार..; डेरेक ओब्रायन यांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज
Follow Us
Close
Follow Us:

 

West Bengal Election:  पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील राजकारण चांगलेच तापले आहे. नुकत्याच समोर आलेल्या ओपिनियन पोलच्या आकडेवारीवरून तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी ओपिनियन पोलचे आकडे फेटाळून लावत भाजपला एक मोठे आणि अजब आव्हान दिले आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे अहवाल समोर येत आहेत. या जनमत चाचणीच्या आकडेवारीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. राज्यसभेतील टीएमसीचे नेते, डेरेक ओ’ब्रायन यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले आहे. डेरेक ओब्रायन यांनी,  जर भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यात एक जरी जागा जिंकली, तर त्यांच्या पक्षाचा एक खासदार जाहीरपणे आपले टक्कल करेल, असे खुले आव्हान दिले आहे.

Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट

कोलकात्यात क्लीन स्वीपचा दावा

ओपिनियन पोलमध्ये सत्ताधारी टीएमसी आणि मुख्य विरोधी पक्ष भाजप यांच्यात चुरशीची लढत दाखवण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ओब्रायन म्हणाले की, “कोलकात्यातील सर्व ११ विधानसभा जागांवर टीएमसीचा विजय निश्चित आहे. जर भाजपने यातील एकही जागा जिंकली, तर आमच्या पक्षाचा एक खासदार आपले डोके मुंडवून टक्कल करेल.” मात्र, ही पैज लावणारा खासदार कोण आहे, याचे नाव त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.

हावडा आणि २४ परगणापर्यंत आव्हानाची व्याप्ती

ओब्रायन यांचा आत्मविश्वास केवळ कोलकात्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी आपल्या आव्हानात हावडा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांचाही समावेश केला आहे.

  • दक्षिण २४ परगणा: येथील ३१ जागांपैकी भाजपला एकही जागा मिळणार नाही.
  • हावडा: येथील १६ जागांवर भाजपचे खातेही उघडणार नाही.

या दोन्ही जिल्ह्यांत भाजपने एक जरी जागा जिंकली, तरी टीएमसी खासदार आपले डोके मुंडवेल, असे ओब्रायन यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, उत्तर २४ परगणामध्ये मात्र भाजला ३-४ जागा मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ओपिनियन पोल जाणूनबुजून टीएमसीची स्थिती कमकुवत दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Andhra Pradesh capital Amaravati : अमरावती बनली आंध्रची ‘कायमस्वरुपी’ राजधानी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली मान्यता

९१ लाख मतदारांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप

या राजकीय संघर्षात टीएमसीने आता निवडणूक आयोगाच्या विरोधातही आघाडी उघडली आहे. नवीन मतदार यादीतून सुमारे ९१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. एका विशिष्ट समुदायाचे लोकशाही हक्क हिरावून घेण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे टीएमसीचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाच्या दारात धरणे आंदोलनाचा इशारा या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी डेरेक ओब्रायन आणि सागरिका घोष यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेणार आहे. जर आयोगाने भेटीसाठी वेळ दिला नाही, तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही तृणमूल काँग्रेसने दिला आहे.

Web Title: West bengal election derek obriens bold challenge to bjp over opinion polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Chief Minister Mamata Banerjee
  • TMC

संबंधित बातम्या

विरोधी पक्षांना मोठा धक्का! मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला
1

विरोधी पक्षांना मोठा धक्का! मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला

Bengal Election: बंगालमध्ये पुन्हा ‘दीदी’च? ताज्या ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढवली; पाहा काय सांगतेय आकडेवारी
2

Bengal Election: बंगालमध्ये पुन्हा ‘दीदी’च? ताज्या ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढवली; पाहा काय सांगतेय आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.