Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 सी फॉर्म नक्की आहे तरी काय? निवडणूक आयोगाकडे विरोधकांची प्रसिद्ध करण्याची मागणी

निवडणूक आयोगाने फॉर्म 17 सी प्रसिद्ध करावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 25, 2024 | 12:21 PM
17 सी फॉर्म नक्की आहे तरी काय? निवडणूक आयोगाकडे विरोधकांची प्रसिद्ध करण्याची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली असून आज सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून प्रत्येक टप्प्यातील मतदान टक्केवारी जाहीर करत असते. मात्र यावेळी निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या आणि अंतिम आकडेवारीतील फरक जाणवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरुन अनेकजण प्रश्न उपस्थित करत असून हे प्रकरण सर्वौच्च न्यायालयामध्ये गेले आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अंतिम मतदान डेटाच्या जारी केल्याच्या संबंधित सुनावणी सुरू केली आहे. यासंदर्भात एका एनजीओने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. रामपूरमधून निवडणूक लढवणारे स्वतंत्र वकील महमूद प्राचा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यांनी संबंधित रिटर्निंग ऑफिसर (RO) ने निवडणूक आचार नियम, 1961 (1961 नियम) नुसार त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या फॉर्म 17C रेकॉर्डच्या प्रती सादर केल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये मतदानाची आकडेवारी उशीराने का जाहीर केली जाते याबाबत देखील निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर किती मते पडली हे दर्शविणारा फॉर्म 17C चा तपशील सार्वजनिक करता येणार नाही, असे देखील निवडणूक आयोगाकडून कोर्टामध्ये सांगण्यात आले आहे.

फॉर्म 17c


फॉर्म 17C असतो तरी काय ?

मतदान प्रक्रियेमध्ये अनेक मतदानकेंद्रे असतात. या प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण किती ट्क्के मतदान झालं असा तपशील देणारा फॉर्म म्हणजे 17C फॉर्म असतो. हा फॉर्म नक्की कसा असतो याचे स्वरुप निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील आयोगाच्या अधिकाऱ्याला एक फॉर्म दिला जातो, जो त्यांनी ऑनलाइन भरावा लागतो. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच हे काम करावे लागते. त्यामुळे मतदान किती झाले याची प्रत्यक्ष माहिती त्यामध्ये भरली जाते. 17C या फॉर्ममध्ये EVM कोणता अनुक्रमांक आहे? मतदान केंद्रावर मतदारांची संख्या किती आहे? 17-अ अंतर्गत मतदार नोंदणीमध्ये मतदारांची संख्या किती आहे? नियम 49-AM अंतर्गत मतदान करण्याची परवानगी नसलेल्या मतदारांची संख्या किती असून मतदान यंत्रात नोंदवलेल्या मतांची संख्या किती आहे असा संपूर्ण तपशील अधिकाऱ्यांना लिहावा लागतो. त्याचबरोबर बॅलेट पेपरची संख्या किती आहे? आहे हे देखील नमूद करावे लागते. यावर सहा पोलिंग एजंटच्या सह्या व निवडणूक अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन फॉर्म अधिकृत केला जातो. यामध्ये मतदान केंद्रावरची इतंभूत माहिती लिहिलेली असते. त्यामुळे ती सार्वजनिकरित्या जाहीर करणे शक्य नसल्याचे मत निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?

निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टातील या स्पष्टीकरणावर कॉंग्रेसकडून विरोध केला जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी फॉर्म 17C बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. जयराम रमेश म्हणाले, 1 कोटी 7 लाखांच्या फरकानुसार लोकसभेच्या प्रत्येक जागेवर 28 हजारांची वाढ झाली आहे, जी खूप मोठी संख्या आहे. ही तफावत अशा राज्यांमध्ये सर्वाधिक आहे जिथे भाजपला लक्षणीय जागा कमी पडण्याची शक्यता आहे. हे काय चालले आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: What is form number 17 c and election commission should make a public announcement case in supreme court nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 12:21 PM

Topics:  

  • Election Commission
  • Supreme Court of India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.