नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या प्रचंड बहुमताने दणदणीत विजय झाला. पण राज्यातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राजकीय तज्ज्ञांनी या निवडणुकीत काहीतरी घोळटा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विरोधकांकडून इव्हीएम मशिन्सबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने इव्हीएम घोटाळ्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर आता थेट सर्वसामान्य नागरिकांकडूनही मतदानांत अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी भाजपवर निशाणा साधत महायुतीचे सरकार जनतेच्या मतांमुळे नव्हे तर दिल्लीत बसलेल्या भाजपच्या अदृश्य शक्तीमुळे जिंकल्याचा आरोप केला आहे. हे सरकार जनतेच्या मतांनी आलेले नाही. दिल्लीत बसलेल्या भाजपच्या लोकांमुळे झाले. त्यांना लोकांची पर्वा नाही. आम्ही आज निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि ते काय निर्णय घेतात ते पाहू, असही त्यांनी यावेळी म्हटलंय.
Maharashtra CM: भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय! अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
तत्पूर्वी, राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाबाबत त्यांची शंका व्यक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे 47 लाख मतदारांची नावे यादीत जोडल्याचा आरोप केला. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “निवडणुका योग्य पद्धतीने न घेतल्यास राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे नुकसान होते. निवडणूक आयोगाने डेटा काढावा आणि आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तथ्ये प्रदान करावीत, ज्याच्या आधारे आम्हाला निष्कर्ष काढता येईल.
सिंघवी पुढे म्हणाले, “आमचा पहिला मुद्दा महाराष्ट्रातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात हटवण्याबाबत होता. या प्रक्रियेसाठी विहित फॉर्म आणि प्रक्रियांचे पालन केले जावे, अशा प्रकारे मतदारांची नावे हटवण्याचा आधार समजून घेण्यासाठी आम्हाला बूथ आणि मतदारसंघानुसार तपशीलवार डेटा आवश्यक आहे. हा डेटा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नावे कशाच्या आधारे हटवण्यात आली हे शोधण्यासाठी आम्हाला मदत होईल.”
International Cheetah Day : आजपासून ‘वायू’ आणि ‘अग्नी’ला कुनोच्या जंगलात करता
“आमचा दुसरा मुद्दा मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याचा होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे पाच महिन्यांत सुमारे 47 लाख मतदारांची नावे जोडण्यात आल्याचे आम्हाला आढळले. ही नावे जोडण्यासाठी फॉर्म कुठे आहेत? घरोघरी जाऊन पडताळणी कशाच्या आधारावर करण्यात आली? याचाही आम्हाला कच्चा डेटा हवा असल्याची मागणी मनुसिंघवी यांनी केली. मतदानातील सात टक्के फरकाकडेही काँग्रेस नेत्याने लक्ष वेधले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 25,000 किंवा त्याहून अधिक मतांची वाढ झालेले 118 मतदारसंघ आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने दणदणीत विजय मिळवला.