पटना : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात (Crime Rate Increase) वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. त्यात आता बिहारमध्ये (Crime in Bihar) एक धक्कादायक घटना घडली. खुद्द पतीनेच स्वत:च्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत संबंध प्रस्थापित करण्यास सांगितल्याची बाब समोर आली आहे. पतीच्या लाजिरवाण्या कृत्याने अखेर पत्नीने पोलीस ठाणे गाठलं आणि पतीचा भांडाफोड केला.
बिहारच्या पटना येथील ही घटना घडली. यामध्ये पतीनेच पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या पतीने पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगितले. त्याला तू आवडतेस, असे पती पत्नीला म्हणत होता. लग्नाच्या तीन महिन्यातच पतीचा खरा चेहरा समोर आल्याने पत्नीला मोठा धक्काच बसला. पती दारूच्या नशेत असताना मारहाण करायचा असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेने पटना येथील जक्कनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
‘वाईफ स्वॅपिंग’ करण्याची इच्छा
या महिलेच्या पतीला वाईफ स्वॅपिंग करण्याची इच्छा होती. तो त्याच्या पत्नीला मित्रासोबत शेअर करणार होता तर त्याचा मित्र त्याच्या पत्नीला, अशाप्रकारे चक्क शरीर संबंधासाठी जोडीदारच बदलण्याची या दोघांची इच्छा होती.
सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
या घटनेनंतर पीडितेने सासरच्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी याउलट सुनेलाच अश्लील बोलण्यास, घाणेरडे हातवारे करण्यास सुरुवात केली. इतकेच नाहीतर सासराही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, महिलेने विरोध केल्याने पतीने त्याच्या मित्राशी संबंध ठेवण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चित्रपटाला शोभेल अशीच कहाणी
2001 मध्ये अजनबी हा चित्रपट अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि नवोदित बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. पत्नी स्वॅपिंगची संकल्पनाही या चित्रपटात दाखवण्यात आली होती. चित्रपटाला शोभेल अशी घटना इथं घडली आहे.