Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात अल्पवयीनांनी दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. अल्पवयीनांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 12:30 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर...; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर...; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार
  • पोलिसांनी चार अल्पवयीनांना घेतले ताब्यात
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात अल्पवयीनांनी दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. अल्पवयीनांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रात्री पावणेअकराच्या सुमारास चौघे अल्पवयीन दुचाकीवरुन आले. ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल’, असे सांगून अल्पवयीनांनी त्यांच्याकडील पिस्तुल उगारून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन अल्पवयीनांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला, तसेच अल्पवयीनांनी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखविला.

या घटनेनंतर अल्पवयीन दुचाकीवरुन पसार झाले. गोेळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडने तपास सुरू केला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

तिघांनी केला तरुणाचा खून

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.

Web Title: An incident of firing by minors has taken place in the gultekdi area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
1

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…
2

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना
3

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.