Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

बारामती तालुक्यातील सूर्यनगरी परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 03:47 PM
घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : बारामती तालुक्यातील सूर्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या दोन घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आणि ११ जानेवारी रोजी दुपारी घडल्या होत्या. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी श्रीकांत अशोकराव बिरादार (वय ३३ रा.सूर्यनगरी, बारामती) हे महावितरण शाखा सणसर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाऊन सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी कपाटातील दागिने ठेवलेला कप्पा उघडा असल्याचे पाहिले. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत असून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच अंदाजे १० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

पत्नी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मुलाला खेळवण्यासाठी खाली रस्त्यावर घेऊन गेल्या असताना घराचा दरवाजा पुढे लावलेला होता. याच वेळेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली आली आहे. यामध्ये सोन्याचे मिनी गंठन (१७.५ ग्रॅम) रु.५०,०००, सोन्याचे काप (८ ग्रॅम) रु.२०,०००, सोन्याचे एअररिंग (४ ग्रॅम) रु.१०,०००, दोन सोन्याच्या अंगठ्या (६ ग्रॅम) रु.१०,०००, चांदीचे पैंजण रु.१,०००, रोख रक्कम रु.१०,००० असा एकूण अंदाजे किंमत २ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरेंद्र वामनराव चव्हाण (वय 48 वर्षे, व्यवसाय मेस, राहणार सुमन रेसिडेन्सी फ्लॅट नं. 3 सूर्यनगरी ता. बारामती) यांच्याही घरी अशीच चोरीची घटना घडली आहे. ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेले आहेत. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांदुळवाडी (ता. बारामती) येथून ऋषिकेश विजय कोकाटे (वय २१, रा. अंबिका नगर, इंदापूर) याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील सोन्याचे दागिने सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे (वय २५ रा.व्यंकटेश नगर, इंदापूर) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोनार कोलते यालाही अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार केदारनाथ बिडवे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राहुल मखरे, सुरेश लांडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवाळे, अभिजीत एकशिंगे यांनी केली आहे.

Web Title: Baramati taluka police have arrested a thief who broke into a house and stole money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
1

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा
2

IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले
3

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप
4

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.