Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Meeting Govt Meeting: धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार? CJPसोबत केंद्राची मिटींगबाबत मोठी अपडेट

सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात असून, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. पण बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 24, 2026 | 03:13 PM
CJP Meeting Govt Meeting: धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार? CJPसोबत केंद्राची मिटींगबाबत मोठी अपडेट
Follow Us
Follow Us:

CJP Protest News: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा,  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडली. या बैठकीला सीजेपीच्या वतीने प्रवक्ते सौरभ दास आणि  आशुतोष रांका यांनी प्रतिनिधीत्त्व केले .

सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात असून, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. पण बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणाऐवजी विठ्ठलभाई पटेल हाऊल या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली.

CJP Press Conference: CJPच्या टीमला आज रात्री अटक होऊ शकते..; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

बैठकींनंतर मिळालेल्या माहितीनुसार बैठकीदरम्यान, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी  विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा आग्रह सीजेपीच्या सदस्यांकडून करण्यात आला. पण दोन ते तीन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे.  उद्या सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. उद्या दुपारपर्यंत धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार  आहेत की नाही. याबाबच चित्र स्पष्ट होईल.

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या प्रतिनिधींसोबत पार पडलेल्या  बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला.   ही बैठक तब्बल २ तास चालल्याचे त्यांनी सांगितले.

Anti Paper Leak Bill: १० वर्षांचा तुरुंगवास अन् १ कोटीचा दंड!

३ प्रमुख मागण्या आणि ५ सुधारणांचे प्रस्ताव

बैठकीतील चर्चेबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले, “…सीजेपी नेत्यांसोबतची बैठक सुमारे २ तास चालली. त्यांनी आमच्यासमोर ३ प्रमुख मागण्या आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ५ महत्त्वाच्या सूचना मांडल्या आहेत. आम्ही त्यांना आश्वस्त केले आहे की, या विषयांवर सरकारमध्ये चर्चा करून उद्या दुपारी आम्ही पुन्हा एकत्र भेटू आणि पुढील निर्णयाची माहिती देऊ.”

उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि ‘सीजेपी’ नेत्यांमधील ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्या दुपारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकीत सरकार काय भूमिका घेते आणि आंदोलनावर काय तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Will dharmendra pradhan resign or not major update regarding the centres meeting with cjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर
1

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

CJP Press Conference: CJPच्या टीमला आज रात्री अटक होऊ शकते..; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा
2

CJP Press Conference: CJPच्या टीमला आज रात्री अटक होऊ शकते..; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

NEET Paper: ‘विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तडजोड नाही’; कोर्टाचे सरकारला खडे बोल, NEET परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3

NEET Paper: ‘विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तडजोड नाही’; कोर्टाचे सरकारला खडे बोल, NEET परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?
4

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.