Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

CJP on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्सल’ या वक्तव्यावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. प्रवक्ते सौरभ दास यांनी प्रश्न विचारणाऱ्या युवकांना अशा शब्दांत संबोधणे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 07:24 PM
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • SRCC कार्यक्रमातील ‘दिमागी नक्सल’ वक्तव्यावरून कॉकरोच जनता पार्टीचा आक्षेप
  • प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र मोदींवर टीका केली
  • ‘युवकांना आशा देण्याऐवजी त्यांना नक्षल म्हणणं चुकीचं’ असा दावा
 

CJP on PM Modi : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधील कार्यक्रमात मोदी यांनी ‘दिमागी नक्सल’ हा शब्द वापरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या वक्तव्यावरून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. देशातील युवक प्रश्न विचारत असतील, तर त्यांच्याकडे संवादाच्या माध्यमातून पाहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘प्रश्न विचारणाऱ्या युवकांना नक्सल म्हणता?’

सोशल मीडिया पोस्टमध्ये दास यांनी म्हटले की, देशातील प्रमुख महाविद्यालयांपैकी एका ठिकाणी जाऊन प्रश्न विचारणाऱ्या युवा पिढीला ‘दिमागी नक्सल’ म्हणणे हे धक्कादायक आहे. विशेषतः शिक्षण दिनाच्या निमित्ताने असे वक्तव्य होणे अधिक गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन

त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी युवकांना नवीन आशा आणि विश्वास देण्याची गरज आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

धर्मेंद्र प्रधान आंदोलनानंतर आता मोदींवर टीका

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने देशभर आंदोलन उभे केल्याचा दावा केला आहे. या आंदोलनानंतर जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाची बैठक झाली.

Chala Shaalet Jauya Campaign: CJPच्या स्कूल ठीक करो मोहिमेचा इम्पॅक्ट; राज्य सरकारकडून ‘चला शाळेत जाऊया’ विशेष अभियान घोषणा

या बैठकीनंतर पक्षाने सध्या निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते.

याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्सल’ या शब्दप्रयोगावरून पक्षाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदींच्या भाषणावर आशुतोष रांका यांनीही टीका केल्याचे या प्रकरणात सांगण्यात आले आहे.

Web Title: Cockroach janata party narendra modi dimaghi naxal statement saurabh das

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janata Party
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास
1

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

PM Modi : हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-टस्क भेट, व्यापार 6 वरून 10 अब्ज डॉलरवर नेणार; पोलंडच्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा भारत दौरा
2

PM Modi : हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-टस्क भेट, व्यापार 6 वरून 10 अब्ज डॉलरवर नेणार; पोलंडच्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा भारत दौरा

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ
3

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत
4

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.