Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडी तुटणार? राहुल गांधींच ‘ते’ वक्तव्य ठरणार कारण

विधानसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. या पराभवासाठी उद्धव यांच्या पक्षाने जाहीरपणे काँग्रेसला जबाबदार धरले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 14, 2024 | 04:54 PM
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडी तुटणार?  राहुल गांधींच ‘ते’ वक्तव्य ठरणार कारण
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवनानंर महाविकास आघाडीत काहीही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी फुटणार अशाही बातम्या येत होत्या. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही संयुक्त पत्रकार परिषद न झाल्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे. त्यातच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे त्यात अधिकच भर पडणार आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात संविधानांवरील चर्चेदम्यान केंद्रसरकारसह वीर सावकरकरही राहुल गांधींच्या निशाण्यावर होते.  शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी सावरकरांची पुन्हा एकदा ‘माफीवीर’ असे वर्णन केले. राहुल म्हणाले की, मी एकदा इंदिरा गांधींना सावरकरांबद्दल प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी मला सांगितले की,  सावरकर इंग्रजांशी सामील झाले होते.

राहुल यांनी दिल्लीस्थित लोकसभेत केलेल्या  या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सावरकरांना माफीवीर म्हटल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना आणि काँग्रेसमधीस संबंध आधीच ताणले गेले होते. दोघांमधील युती आधीच एका नाजूक वळणावर आली होती. त्यातच राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडते की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Mandir Found in Muslim Area: मुस्लिमबहुल भागात आढळले 50 वर्षे जुने मंदिर; नक्की काय आहे प्रकरण?

राहुल सावरकरांबद्दल काय म्हणाले?

सावरकरांचा मनुस्मृतीवर विश्वास असेल तर ते राज्यघटनेच्या पूर्णपणे विरोधात आहेत. सावरकरांना संविधानातही भारतीयत्व दिसले नाही. त्यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारले की, सावरकरांबद्दल इंदिरा गांधींचे काय मत होते? या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी एकदा इंदिरा गांधींना हे विचारले होते. त्याला उत्तर देताना त्या  म्हणाल्या की,  स्वातंत्र्याच्या  आंदोलनात सगळे तुरुंगात गेले, पण सावरकर मात्र तडजोड करणारे निघाले. सावरकर घाबरले आणि त्यांनी इंग्रजांची माफी मागितली.राहुल यांच्या या वक्तव्यावर सभागृहात गदारोळ झाला. मात्र, यावर काँग्रेसचे खासदार खूश दिसत होते.

सावरकरांवर न बोलण्याचा करार

2022 मध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. यावेळी राहुल वीर सावरकरांवर हल्ला करताना दिसले, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आक्षेप घेतला होता. संजय राऊत यांनी जाहीरपणे सावरकरांचे हिरो असे वर्णन केले होते. राहुल यांनी पूर्वजांचा मुद्दा उपस्थित करणे टाळावे, असेही आवाहन संजय राऊतांनी केले होते.

Martial Law: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव

त्यावेळी दोघांमधील युती तुटण्याची चर्चा होती, पण अखेर दोघांमध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे राहुल सावरकरांवर काहीही बोलत नव्हते, असे सांगितले जाते. राहुल सावरकरांच्या मुद्द्यावर गेली 2 वर्षे मौन बाळगून होते, मात्र आता महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर ते अचानक बोलू लागले आहेत.

उद्धव यांच्या पक्षामुळे प्रकरण चिघळणार का?

विधानसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. या पराभवासाठी उद्धव यांच्या पक्षाने जाहीरपणे काँग्रेसला जबाबदार धरले होते. काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

अनेक जागांवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला नाही, असे शिवसेनेचे (उद्धव) म्हणणे आहे.  सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव) उमेदवार रिंगणात होते. ही जागा काँग्रेसचे बलाढ्य नेते सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला मानली जाते. येथे मतदानाच्या दिवशी शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा… मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

अशा परिस्थितीत राहुल यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यातील संबंध अधिक बिघडू नयेत, असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे (UBT) डोळे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहेत. ठाकरे घराण्याचा हा बालेकिल्ला मानला जातो. येथे हिंदुत्व आणि मराठा हा मोठा मुद्दा आहे. अशा स्थितीत उद्धव यांचा पक्ष या मुद्द्यावर गप्प बसण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Will the maha vikas aghadi break up due to rahul gandhis statement nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 04:54 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Rahul Gandhi
  • shivsena

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
3

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
4

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.