Winter session adjourned for two days over Sambhal mosque survey violence in Uttar Pradesh
नवी दिल्ली : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आजपासून (दि.25) या अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र कार्यवाहीच्या अगदी एका तासामध्ये अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. तासाभराच्या अधिवेशनामध्ये मोठा राडा झाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे मोठा गदारोळ झाला. यावरुन लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका मशीदीच्या मुदद्यांवरुन हा वाद सुरु झाला आहे. संभलमधील मशीदीचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी दोन गटामध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी ट्वीट केले. आणि हाच मुद्दा विरोधकांनी संसदेमध्ये उचलून धरला. यामुळे विरोधी व सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला. या हिंसाचार प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या मुद्द्यांवर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये संसदेमध्ये वाद निर्माण झाल्यावर अध्यक्षांनी 12 वाजेपर्यंत अधिवेशन स्थगित केले. मात्र पुन्हा एकदा कामकाज सुरु झाल्यानंतर वाद सुरु झाला. यामुळे अध्यक्षांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवार पर्यंत स्थगित केले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी ही स्थगिती आली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय आहे राहुल गांधींचे ट्वीट?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर या संभल मशीद सर्वेक्षण प्रकरणातील मृत्यूंवर भाष्य केले. राहुल गांधींनी लिहिले की, उत्तर प्रदेशातील संभल येथे नुकत्याच झालेल्या वादावर राज्य सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना.
पुढे लिहिले आहे की, सर्व संबंधितांचे न ऐकता प्रशासनाने केलेल्या असंवेदनशील आणि असंवेदनशील कृतीमुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला – ज्याला भाजप सरकार थेट जबाबदार आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी भाजपचा सत्तेचा वापर राज्याच्या किंवा देशाच्या हिताचा नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा. शांतता आणि परस्पर सौहार्द राखण्याचे माझे आवाहन आहे. जातीयवाद आणि द्वेष न करता भारत एकता आणि संविधानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमधून केले आहे.
संभल, उत्तर प्रदेश में हालिया विवाद पर राज्य सरकार का पक्षपात और जल्दबाज़ी भरा रवैया बेहद दुर्भाग्यपूर्ण है। हिंसा और फायरिंग में जिन्होंने अपनों को खोया है उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं हैं।
प्रशासन द्वारा बिना सभी पक्षों को सुने और असंवेदनशीलता से की गई कार्रवाई ने माहौल और…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 25, 2024