महायुतीचे आमदार खासदार विमानाने मुंबईला रवाना
कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राज्याच्या जनतेने महायुतीला चांगला पाठिंबा दिल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर महाविकास आघडीचा सुपडासाफ झालेला आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईहून खास विमान या आमदारांना नेण्यासाठी कोल्हापुरात पाठवल्यात आले होते. कोल्हापूर विमानतळावरून हे सर्व आमदार आणि खासदार सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत.
हेदेखील वाचा : …तर उद्धव सेनेचा १० जागांवर झाला असता दारूण पराभव; कट्टर विरोधक तरीही राज ठाकरेंनी अशी केली भावाची मदत
लोकसभा निवडणुकीत एक खासदार तसेच विधानसभा निवडणुकीत सात आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांना नेण्यासाठी खास विमान पाठवण्यात आले होते. सकाळी हे विमान कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी नूतन आमदार राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजी पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर ,अमल महाडिक, राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक हे सर्वजण या विमानामध्ये बसून मुंबईला प्रयाण केले. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
यासाठी महाराष्ट्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांची सोय एका खास हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
महाविकास आघाडीला मोठा फटका
राज्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यात पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांनी लंके यांचा पराभूत केले. ‘लाेकसभेत जिंकले, विधानसभेत हरले’, अशी लंकेची अवस्था झाली.
युगेंद्र पवार यांचा पराभव
पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातील लढतीकडे देशभरातील राजकीय पंडिताच्या नजरा लागल्या हाेत्या. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांना व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यात सामना झाला. यात अजित पवार यांनी माेठ्या फरकाने युगेंद्र पवार याच्यांवर मात केली.
हेदेखील वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या कन्येची प्रतिक्रिया; दिविजा भविष्यात राजकारणात दिसून येणार?