J&k Election 2024: जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली 'ही' आश्वासने
श्रीनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कारा, काँग्रेस मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष उपस्थित होते. पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले , काश्मीरमधील तरुण, शेतकरी, काश्मिरी पंडित, ओबीसी या सर्वांना त्यांचे हक्क मिळतील आणि हीच जनतेसाठी काँग्रेसची हमी आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद करा यांनी हा जाहीरनामा जनतेचा जाहीरनामा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, २२ जिल्ह्यांतील समित्यांच्या माध्यमातून आम्ही समाजातील विविध घटकांशी संपर्क साधला, अभिप्राय गोळा केला आणि ही मौल्यवान माहिती या जाहीरनाम्यात समाविष्ट केली. त्याला आम्ही अभिमानाने जनतेचा जाहीरनामा असे संबोधत आहोत.
काँग्रेसचे मिडिया प्रभारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, ”गेल्या १० वर्षांपासून काश्मीरमधील परिस्थितीमुळे काश्मीरचे हृदय अनेक जखमांनी भरले आहे. पण आता त्या जखमा भरून काढण्याची वेळ आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एक नवीन सत्र पाहायला मिळणार आहे. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीत असे सरकार काम करत आहे, ज्यामध्ये जनतेचा आवाज ऐकू येत नाही. हे लक्षात घेऊन आमची टीम २२ जिल्ह्यांमध्ये गेली, लोकांशी बोलली आणि त्याअंतर्गत आमचा जाहीरनामा तयार करण्यात आला.
आज जम्मू-कश्मीर विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस का मेनिफेस्टो लॉन्च किया गया।
इस मौके पर जम्मू-कश्मीर कांग्रेस अध्यक्ष तारिक हमीद कर्रा जी और कांग्रेस मीडिया और पब्लिसिटी विभाग के चेयरमैन @Pawankhera जी मौजूद रहे।
📍 श्रीनगर, जम्मू-कश्मीर pic.twitter.com/TFuZWRbfr9
— Congress (@INCIndia) September 16, 2024
जम्मू काश्मीरमध्ये ९० जागांसाठी तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या तारखेला तीन टप्प्यांत जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक फारुख अब्दुला यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. फारुख अब्दुला यांचा पक्ष ५१ तर काँग्रेस ३२ जागांवर निवडणूक लढणार आहे.