Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास

19 October Dinvishesh: मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि गीतकार शांता शेळके यांचा आज जन्म झाला. त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित लेख आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारांतून विपुल लेखन करून मराठी साहित्य समृद्ध केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 19, 2026 | 09:53 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

19 October Dinvishesh: मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि गीतकार शांता शेळके यांचा आज जन्म झाला. त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित लेख आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारांतून विपुल लेखन करून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या सोप्या, सहज पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दरचनेमुळे त्यांची गीते आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘शूर आम्ही सरदार’ यांसारखी त्यांची अनेक भावगीते आणि चित्रपटगीते प्रचंड गाजली. त्यांनी अमरावती आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आणि अनेक नवीन साहित्यिकांना मार्गदर्शन केले. १९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी मराठी साहित्यविश्वात आपला विशेष ठसा उमटवला.

१९ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1216 : इंग्लंडचा राजा जॉन मरण पावला आणि त्याचा 9 वर्षांचा मुलगा हेन्री सिंहासनावर बसला.
  • 1791 : स्वीडन आणि रशिया यांच्यात ड्रॉटनिंगहोमचा करार
  • 1812 : नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोमधून माघार घेतली.
  • 1914 : पहिले महायुद्ध : यप्रेसची पहिली लढाई सुरू झाली.
  • 1933 : जर्मनी लीग ऑफ नेशन्समधून बाहेर पडला.
  • 1935 : लीग ऑफ नेशन्सने, इथिओपियावर आक्रमण केल्याबद्दल इटलीवर आर्थिक निर्बंध लादले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – युनायटेड स्टेट्सचे सैन्य फिलीपिन्समध्ये उतरले.
  • 1956 : सोव्हिएत युनियन आणि जपानने संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ऑगस्ट 1945 पासून अस्तित्त्वात असलेल्या दोन देशांमधील युद्धाची स्थिती अधिकृतपणे समाप्त केली.
  • 1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाला देण्यात आले.
  • 1974 : नियू ही न्यूझीलंडची स्वयंशासित वसाहत बनली.
  • 1987 : युनायटेड स्टेट्स नेव्हीने ऑपरेशन निंबल आर्चर केले, पर्शियन गल्फमधील दोन इराणी तेल प्लॅटफॉर्मवर हल्ला.
  • 1993 : पुण्याजवळील महारेडिओ टेलिस्कोप, GMRT प्रकल्पाचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ, प्रा. गोविंद स्वरूप यांना सर सी. व्ही. रमण पदक जाहीर.
  • 1994 : रुद्र वीणा वादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2000 : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य सरकारच्या गीत सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2005 : सद्दाम हुसेनवर बगदादमध्ये मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी खटला सुरू.
Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

१९ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1902 : ‘दिवाकर कृष्ण केळकर’ – कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1973 – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
  • 1910 : ‘सुब्रमण्यन चंद्रशेखर’ – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1995)
  • 1920 : ‘पांडुरंगशास्त्री आठवले’ – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
  • 1922 : ‘शांता शेळके’ – मराठी कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1925 : ‘डॉ. वामन दत्तात्रय वर्तक’ – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2001)
  • 1936 : ‘शांताराम नांदगावकर’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुलै 2009)
  • 1954 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 2002)
  • 1961 : ‘सनी देओल’ – अभिनेते यांचा जन्म.
Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

१९ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1216 : ‘जॉन’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1166)
  • 1934 : ‘विश्वनाथ कार’ – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1864)
  • 1937 : ‘अर्नेस्ट रुदरफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1871)
  • 1986 : ‘समोरा महेल’ – मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1933)
  • 1950 : ‘विष्णू गंगाधर केतकर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1887)
  • 1995 : ‘सलमा बेग ऊर्फ कुमारी नाझ’ – बाल कलाकार व अभिनेत्री यांचे निधन.
  • 2003 : ‘अलिजा इझेटबेगोविच’ – बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1925)
  • 2011 : ‘कक्कणदन’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1935)

Web Title: 19 october dinvishesh shanta shelke birth anniversary history marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती
1

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती

End Poverty: केवळ आर्थिक विवंचना नव्हे, तर सन्मानाने जगण्याच्या हक्काचा लढा; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि उपाय
2

End Poverty: केवळ आर्थिक विवंचना नव्हे, तर सन्मानाने जगण्याच्या हक्काचा लढा; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि उपाय

17 October Dinvishesh: आज आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन; जाणून घ्या १७ ऑक्टोबरचा इतिहास..
3

17 October Dinvishesh: आज आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन; जाणून घ्या १७ ऑक्टोबरचा इतिहास..

World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख
4

World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.