Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 October Dinvishesh: आज आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन; जाणून घ्या १७ ऑक्टोबरचा इतिहास..

17 October Dinvishesh: दरवर्षी आजच्या दिवशी गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे जागतिक स्तरावर गरिबीच्या प्रश्नावर लक्ष वेधणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून देणे हे आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 17, 2026 | 09:40 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

17 October Dinvishesh: दरवर्षी आजच्या दिवशी गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे जागतिक स्तरावर गरिबीच्या प्रश्नावर लक्ष वेधणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून देणे. गरिबी हा केवळ आर्थिक समस्यांचा विषय नसून त्यात आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी, आणि माणसाचे जीवनमान यांचा समावेश असतो. जगातील अनेक लोक अद्याप अत्यंत गरिबीत जगत आहेत, आणि त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मूलभूत साधने उपलब्ध नसतात. त्या लोकांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शाश्वत विकास, समाजातील वंचित घटकांचा विकास आणि आर्थिक संधी निर्माण करणे यावर जोर दिला जातो.

१७ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1831 : मायकेल फॅराडे यांनी इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शनची गुणधर्म प्रायोगिकरित्या सिद्ध केली.
  • 1888 : थॉमस एडिसनने ऑप्टिकल फोनोग्राफ (पहिली फिल्म) साठी पेटंट दाखल केले.
  • 1917 : पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्ब हल्ला केला.
  • 1931 : माफिया डॉन अल कॅपोनला आयकर चोरीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
  • 1933 : अल्बर्ट आइनस्टाईन नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आले.
  • 1934 : प्रभातचा अमृतमंथन हा चित्रपट पुण्यातील प्रभात सिनेमात प्रदर्शित झाला.
  • 1943 : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक रेल्वे पूर्ण झाली.
  • 1956 : पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू झाला.
  • 1966 : बोत्सवाना आणि लेसोथो संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1979 : मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1994 : पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
  • 1996 : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
  • 1998 : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.
Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

१७ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1817 : ‘सर सय्यद अहमद खान’ – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1898)
  • 1869 : ‘पं. भास्करबुवा बखले’ – गायनाचार्य, भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1922)
  • 1892 : ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 1968)
  • 1917 : ‘विश्वनाथ तात्यासाहेब कोर’ – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1994)
  • 1930 : ‘रॉबर्ट अटकिन्स’ – अटकिन्स आहार चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2003)
  • 1947 : ‘सिम्मी गरेवाल’ चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1955 : ‘स्मिता पाटील’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1986)
  • 1965 : ‘अरविंद डिसिल्व्हा’ – श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1970 : ‘अनिल कुंबळे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

१७ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1772 : ‘अहमदशाह दुर्रानी (दुराणी)’ – अफगणिस्तानचे राज्यकर्ता यांचे निधन.
  • 1882 : ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1814)
  • 1887 : ‘गुस्ताव्ह किरचॉफ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1824)
  • 1906 : ‘स्वामी रामतीर्थ’ – जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी यांनी जलसमाधी घेतली. (जन्म : 22 ऑक्टोबर 1873)
  • 1981 : ‘कन्नादासन’ – भारतीय लेखक, कवी आणि गीतकार यांचे निधन. (जन्म : 24 जून 1927)
  • 1993 : ‘विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 12 मे 1907)
  • 2008 : ‘रविन्द्र पिंगे’ – ललित लेखक यांचे निधन. (जन्म : 13 मार्च 1926)
  • 2008 : ‘बेन व्हिडर’ – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1923)
💡

Frequently Asked Questions

  • Que: आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन साजरा केला जातो.

  • Que: १७ ऑक्टोबर १९७९ रोजी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला?

    Ans: १७ ऑक्टोबर १९७९ रोजी मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: 17 october international poverty eradication day dinvishesh history sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख
1

World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख

World Food Day : 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन; भूकमुक्तीचा संकल्प आणि अन्नाची नासाडी रोखण्याची नवी चळवळ
2

World Food Day : 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन; भूकमुक्तीचा संकल्प आणि अन्नाची नासाडी रोखण्याची नवी चळवळ

International Rural Women Day: डिजिटल युगात बदलतोय ग्रामीण महिलांचा चेहरा; कसा आहे ‘लखपती दिदी’ ते उद्योजकतेचा रंजक प्रवास
3

International Rural Women Day: डिजिटल युगात बदलतोय ग्रामीण महिलांचा चेहरा; कसा आहे ‘लखपती दिदी’ ते उद्योजकतेचा रंजक प्रवास

World Student Day: ‘स्वप्ने ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहता…’ वाचा ‘या’ खास दिनानिमित्त डॉ. कलाम यांचे 5 अजरामर विचार
4

World Student Day: ‘स्वप्ने ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहता…’ वाचा ‘या’ खास दिनानिमित्त डॉ. कलाम यांचे 5 अजरामर विचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.