Aadhar card available at scrap shop in Nagpur for only Rs 20, police seize more than 100 Aadhar cards
नागपूर: नागपूर शहराच्या जरीपटका भागातील भंगाराच्या खरेदी विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात आधार कार्ड आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपुरातील आम आदमी पक्षाचे प्रभात अग्रवाल आणि अन्य कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आणली आहे. जरीपटका पोलिसांनी १०० पेक्षा जास्त आधार कार्ड जप्त करून तपास सुरू केला आहे.
[read_also content=”अखेर यो यो हनीसिंग नागपूर पोलिसांसमोर हजर, तब्बल साडेचार तास दिले आवाजाचे नमुने https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/finally-yo-yo-honey-singh-appeared-before-the-nagpur-police-and-gave-voice-samples-for-four-and-a-half-hours-nraa-238433.html”]
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात एका भंगाराच्या दुकानातून केवळ वीस रुपये घेऊन आधार कार्ड देण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून माहितीची सत्येची पडताळणी केली. तेव्हा, भंगार दुकान मालकाकडे अनेकांच्या नावाचे आधार कार्ड तयार असून तो केवळ २० रुपयात विक्री करताना दिसून आला. त्यानंतर, आपचे कार्यकर्ते प्रभात अग्रवाल यांनी जरीपटका पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भंगाराच्या दुकानातून १०० पेक्षा जास्त आधारकार्ड जप्त केले आहेत.
[read_also content=”जि.प.च्या तब्बल २२ शाळांमध्ये पटपडताळणी, बोगस पटसंख्येमुळे शाळांवर कारवाईची टांगती तलवार ! https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/as-many-as-22-schools-in-zp-are-being-searched-action-is-being-taken-against-schools-due-to-bogus-pass-numbers-nraa-238761.html”]
कचऱ्यात मिळाले शेकडो आधारकार्ड
नागपुरातील मेकोसाबाग परिसरात कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगार्यात आधार कार्डचा एक बंडल मिळून आला. त्याने ते सर्व आधार कार्ड समोरच असलेल्या भंगार दुकानातील मालकाच्या स्वाधीन केले. आधारकार्ड वर असलेल्या मोबाईल नंबर वर फोन करून आधार कार्ड धारकला २० रुपयांचा मोबदला देऊन ते आधार कार्ड विक्री केले जात होते. एवढेच नाही तर ज्यांनी आधारकार्डची मागणी केली, त्यांना सुद्धा पैसे घेऊन आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्यांची चौकशी सुरू केली आहे. परंतु, पोस्टामार्फत येणारे महत्वाचे समजले जाणारे आधार कार्ड असे भंगारात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.