मुंबई : मुंबई बँकेत झालेल्या २ हजार रुपये कोटींचा घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करून या फसवणुकी प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या मुंबई प्रभारी प्रीती शर्मा व सचिव धनंजय शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली(Aam Aadmi Party demands probe into Mumbai Bank scam through SIT).
मुंबई बँक ही एक सरकारी बँक आहे. या बँकेच्या नियमांची फसवणूक करून प्रवीण दरेकर यांनी’ मजूर ‘ असल्याचा दावा केला. त्यांनी २०११ से २०२१ या कालावधीत दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम केले. त्यापूर्वी से दोन वेळा संचालक होते. या कालावधीत सहकार विभाग आणि नाबार्डच्या लेखापरीक्षण अहवालानुसार, २००० कोटीच्या गैरव्यवहाराशी संबंधित अनियमितता आढळून आली. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डने वारंवार मुंबई बँकेत भष्टाचार झालेचे सहकार मंत्रांच्या निदर्शनास आणून दिले.मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांची पाठराखण केली . त्यामुळे गुन्ह्यांसाठी तेही तितकेच जबाबदार आहेत .असा आरोप ही आपने केला.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्र सरकारने हजारो ग्राहकांवर ज्या घोटाळ्याने अन्याय झाला त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी बसवावी तसेच बँकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आरबीआयने प्रशासक नेमावा अशी मागणी ही प्रीती शर्मा व धनंजय शिंदे यांनी केली.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]