Tea Side Effects: उपाशी पोटी चहा पिण्याची सवय बेतू शकते जीवावर! जाणून घ्या चहा पिण्याचे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
Tea Side Effects: आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. सकाळी उठल्यानंतर चहा, मानसिक तणाव वाढल्यानंतर चहा, कामामध्ये चहा तर काहीवेळा जेवणानंतरसुद्धा लगेच चहा कॉफी पिण्याची सवय असते. दिवसभरात ५ ते ६ वेळा चहा, कॉफी प्यायल्याशिवाय चैन पडत नाही. चहा प्यायल्यानंतर खूप फ्रेश आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. मानसिक तणाव कमी होण्यासोबतच काम करण्याचा उत्साह निर्माण होतो.(फोटो सौजन्य – istock)
चहामध्ये असलेल्या कॅफ़िनमुळे आणि साखरेमुळे शरीरावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वारंवार चहाचे सेवन करणे टाळावे. आवडीने प्यायला जाणारा चहा कालांतराने शरीरासाठी गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे दिवसभर दोन किंवा जास्तीत तीन वेळाच चहाचे सेवन करावे. अतिप्रमाणात चहा पिऊ नये. चला तर जाणून घेऊया उपाशी पोटी चहा प्यायल्यामुळे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम.
वारंवार चहा कॉफी प्यायल्यामुळे झोपेच्या आरोग्यावर परिणाम होतो. चहामध्ये असलेले कॅफिन उत्तेजक द्रव्य आहे, ज्यामुळे मेंदू जागृत राहण्यास मदत होते. पण दिवसभरात खूप जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार जाग येणे, शांत झोप न लागणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी चहा पिणे टाळावे.
चहा, कॉफीसोबत अनेकांना कायमच तेलकट पदार्थ किंवा बिस्कीट खाण्याची खूप जास्त सवय असते. पण चहामध्ये असलेल्या कॅफिन आणि इतर घटकांमुळे पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा मळमळ वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ऍसिडिटीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी चहाचे सेवन करावे. खूप जास्त कडक किंवा वारंवार दुधाचा चहा पिणे टाळावे.
चहामध्ये टॅनिन आणि इतर पॉलिफेनॉल घटक आढळून येतात. ज्याच्या परिणामामुळे अन्नातील लोहाची पातळी शोषून घेतली जाते. वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळणाऱ्या लोहाच्या शोषणावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर लगेच किंवा जेवणाच्या आधी चहा पिऊ नये. अतिप्रमाणात चहा प्यायल्यामुळे लोहाची कमतरता किंवा हिमोग्लोबिन कमी होऊन जाते.
चहामधील कॅफिनचे प्रमाण जास्त झाल्यानंतर काहींच्या हृदयावर त्याचे परिणाम दिसून येतात. यामुळे हात थरथरणे, घाबरल्यासारखे वाटणे, बेचैनी किंवा हृदयाचे ठोके वेगाने वाढणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कॅफिनची संवेदनशीलता असणाऱ्या व्यक्तींनी चहाचे सेवन करू नये. चहाचे सेवन केल्यास अतिशय कमी प्रमाणात करावे.
Ans: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काही लोकांना ॲसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते. चहामधील कॅफिनमुळे पोटाच्या त्रासात वाढ होऊ शकते.
Ans: उपाशी पोटी चहा प्यायल्याने प्रत्येकालाच त्रास होतो असे नाही. मात्र ॲसिडिटी किंवा पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.
Ans: चहाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. दिवसभरातील एकूण कॅफिनचे प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. गर्भवती महिला आणि कॅफिनबाबत संवेदनशील असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.






